WOMAN COLLECTOR HARASSMENT CASE saam tv
देश विदेश

महिला कलेक्टरला अश्लील मेसेज; सत्ताधारी आमदाराला अटक, राजकारणात खळबळ

Tamil Nadu TVK MLA C Arul Vignesh Arrested: तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या TVK पक्षाचे आमदार सी. अरुल विग्नेश यांना महिला जिल्हाधिकाऱ्याच्या कथित लैंगिक छळप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या TVK पक्षाचे आमदार सी. अरुल विग्नेश यांना महिला जिल्हाधिकाऱ्याच्या लैंगिक छळप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिला अधिकाऱ्याने आमदारावर आक्षेपार्ह पाठवणे आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी 24 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मद्रास हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते.

आमदाराच्या अटकेनंतर DMK नेते आणि माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमदाराला वाचवण्यासाठी सातत्याने खोट बोललं गेलं आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. मंत्र्यांपासून ते मित्रपक्षांच्या नेत्यांपर्यंत अनेकांनी महिलेच्या तक्रारी फेटाळून लावत आमदाराला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच तक्रारदार महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास देण्यासाठी सोशल मीडियावर अपमानास्पद मोहीम राबवण्यात आल्याचा आरोपही स्टॅलिन यांनी केला. विविध दबावांना न जुमानता महिला अधिकाऱ्याने मोठ्या हिमतेने तक्रार दाखल केली. हायकोर्टाच्या आणि महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर आमदाराला अटक करण्यात आल्याचं स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.

महिला जिल्हाधिकाऱ्याने 23 नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आमदार सी. अरुल विग्नेश यांनी आपल्याला आक्षेपार्ह मेसेज पाठवले तसेच अनेक प्रसंगी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. या तक्रारीनंतर कल्लाकुरिची येथील महिला पोलीस ठाण्यात आमदाराविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि तामिळनाडूतील महिलांच्या छळाला प्रतिबंध करणाऱ्या कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, आमदार अरुल विग्नेश यांनी यापूर्वी हे सर्व आरोप फेटाळले होते. आपली आणि पक्षाची प्रतिमा खराब करण्यासाठी राजकीय हेतूने हे आरोप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Newly Married Bride: लग्नानंतर नव्या नवरीने सासरी गेल्यावर करू नयेत या चुका; सुखी संसारासाठी ४ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Nail Health : नखांचा रंग आणि आकार बदलतोय? शरीरात लोहाची कमतरता असल्याचा असू शकतो संकेत

सोलापूर जिल्हा बँकेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता; काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव, विजेत्यांची यादी एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यात एआयडेटा सेंटरच्या विरोधात शेतकऱ्यांचा मशाल मोर्चा

Nauvari Saree Draping: नऊवारी साडी नेसताना गोंधळ होतोय? या ७ सोप्या स्टेप्स फॉलो करुन नेसा परफेक्ट साडी

SCROLL FOR NEXT