मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या 2 दिग्गज नेत्यांचा राजीनामा; भाजपला मोठा धक्का, विरोधी पक्षात केला प्रवेश

Bjp Leaders Resign Join Samajwadi Party Gorakhpur Yogi Adityanath: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नगरसेवक विश्वजित त्रिपाठी आणि शिक्षणतज्ज्ञ मुकेश शर्मा यांनी राजीनामा देत अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला.
Two BJP leaders resign and join Samajwadi Party
Two BJP leaders resign and join Samajwadi Partysaam tv
Published On: 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोरखपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नगरसेवक विश्वजित त्रिपाठी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत शिक्षणतज्ञ मुकेश शर्मा यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली देत सपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. मुकेश शर्मा यांच्या अनेक शिक्षणसंस्था आहे.

Two BJP leaders resign and join Samajwadi Party
सांगली हादरली! आधी एकजण खाली उतरला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला, अन् पाहता पाहता तिघांचाही मृत्यू; नेमकं काय घडलं?

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत लखनऊ येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक नेत्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.

मुकेश शर्मा यांनी सपामध्ये प्रवेश केल्यानंतर काय म्हणाले?

शिक्षणतज्ज्ञ मुकेश शर्मा यांनी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. आजपर्यंत आपण कोणत्याही राजकीय पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Two BJP leaders resign and join Samajwadi Party
28 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; गुन्हेगारांवर वचक बसणार? कोणाची कोणत्या जिल्ह्यात नियुक्ती?

ते म्हणाले की, यापूर्वी आपण मतदान दुसऱ्या पक्षाला करत होतो. मात्र, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली नोएडामध्ये झालेला बदल पाहिल्यानंतर आपले विचार आणि राजकीय भूमिका बदलली. २०२२ मध्ये अखिलेश यादव यांची भेट झाली होती. त्याआधीही समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केली होती. त्याबद्दल आपण त्यांचे आभारी असल्याचेही मुकेश शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, रायबरेली येथील प्रभाकर गुप्ता यांनीही आपल्या समर्थकांसह समाजवादी पक्षात प्रवेश केला. ते अखिल भारतीय उद्योग व्यापार मंडळाचे रायबरेली जिल्हाध्यक्ष आहेत.

तसेच रायबरेलीतील के. के. साहू यांनीही सपाचे सदस्यत्व स्वीकारले. ते अखिल भारतीय उद्योग व्यापार मंडळाचे नगराध्यक्ष आहेत. विश्वजीत त्रिपाठी हे गोरखपूरमधील नगरसेवक आहेत. यापूर्वी ते समाजवादी पक्षात होते. मात्र, त्यांनी सपाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी समाजवादी पक्षात घरवापसी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.