28 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; गुन्हेगारांवर वचक बसणार? कोणाची कोणत्या जिल्ह्यात नियुक्ती?

28 IPS Officers Transfer List 2026: पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने 28 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून मोहित अग्रवाल, लक्ष्मी सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
UP IPS Transfer List 2026
UP IPS Transfer List 2026saam tv
Published On: 

पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनात देखील मोठे फेरबदल सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. अशातच शुक्रवारी (दि.27) रोजी तब्बल 28 IPS अधिकऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलिस महासंचालक, पोलिस उपमहानिरीक्षक आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अनेक महत्वाच्या जिल्ह्यांचे पोलिस प्रमुखही बदलण्यात आले आहेत.

UP IPS Transfer List 2026
डिलिमिटेशन विधेयकाला केंद्राची मंजुरी; लोकसभेच्या किती जागा वाढणार, कुणाचा पाठिंबा, कुणाचा विरोध, पुढे काय होणार?

या बदल्यांमध्ये मोहित अग्रवाल यांची वाराणसी पोलिस आयुक्तपदावरून प्रयागराज पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रयागराजचे पोलिस आयुक्त पीयूष मोर्डिया यांची लखनऊ येथे उत्तर प्रदेशच्या ADG पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मी सिंह यांची गौतमबुद्धनगर पोलीस आयुक्तपदावरून गाझियाबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जे. रविंदर गौड यांची गाझियाबादहून गौतमबुद्धनगरच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. किरण एस. यांची लखनऊ परिक्षेत्राच्या आयजी पदावरून वाराणसीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

UP IPS Transfer List 2026
Delimitation Bill: मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

ADG आणि DIG स्तरावरही बदल्या

ADG स्तरावरही महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. रमित शर्मा यांची ADG बरेली झोनवरून ADG लखनऊ झोनमध्ये बदली करण्यात आली आहे. तर प्रवीण कुमार यांना ADG लखनऊ झोनवरून ADG बरेली झोनची जबाबदारी देण्यात आली आहे. DIG स्तरावर प्रभाकर चौधरी यांची अलीगढमधून लखनऊ येथे बदली करण्यात आली आहे. अभिषेक सिंह यांना सहारनपूरऐवजी आग्रा येथील जबाबदारी देण्यात आली आहे. तर शैलेश कुमार पांडेय यांची आग्र्याहून अलीगढमध्ये बदली करण्यात आली आहे. आशीष तिवारी यांची तांत्रिक सेवा विभागातून सहारनपूरला नियुक्ती करण्यात आली आहे.

UP IPS Transfer List 2026
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव लोडरची टेम्पोला धडक, तरूण क्रिकेटपटूसह ४ जणांचा मृत्यू

अयोध्या आणि मुरादाबादचे SSP बदलले

जिल्हा स्तरावरही महत्त्वाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. डॉ. गौरव ग्रोवर यांना अयोध्येच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक पदावरून हटवून मुरादाबादचे SSP म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर मुरादाबादचे एसएसपी सतपाल यांच्याकडे अयोध्येची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 28 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.