Nail Health : नखांचा रंग आणि आकार बदलतोय? शरीरात लोहाची कमतरता असल्याचा असू शकतो संकेत

Low iron signs : आपली नखे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून ती आपल्या अंतर्गत आरोग्याचा आरसा आहेत. सौंदर्यासोबतच नखांमध्ये होणारे बदल हे शरीरात लोहाची कमतरता असल्याचे महत्त्वाचे संकेत असू शकतात.
Changes in Nail Shape and Color as Warning Signs of Iron Deficiency
Changes in Nail Shape and Color as Warning Signs of Iron Deficiencysaam tv
Published On: 

शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोह अर्थात आयर्न हे खनिज अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची गरज असते. हिमोग्लोबिनच्या मदतीने रक्त शरीराच्या विविध भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवते. मात्र, शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात. विशेष म्हणजे, लोहाच्या कमतरतेचा परिणाम हातांच्या आणि पायांच्या नखांवरही दिसून येऊ शकतो.

नखे कमकुवत आणि ठिसूळ होतात

शरीरात लोहाची कमतरता असल्यास नखे कमकुवत होऊ शकतात. ती सहज तुटतात, त्यांना तडे जातात किंवा नखांचे थर निघू लागतात. नखांची वाढही मंदावू शकते.

Changes in Nail Shape and Color as Warning Signs of Iron Deficiency
Stress And Diabetes : जास्त टेन्शन घेता? सावधान! होऊ शकतो मधुमेहाचा धोका? जाणून घ्या तज्ज्ञांकडून महत्त्वाची माहिती

नखांचा रंग फिका पडतो

नखांच्या खालच्या भागात फिकटपणा दिसणे हे अॅनिमियाचे एक संभाव्य लक्षण असू शकते. शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे नखांचा नैसर्गिक गुलाबी रंग फिका दिसू शकतो.

नखांचा आकार चमच्यासारखा होतो

लोहाच्या कमतरतेमुळे नखांचा आकार बदलू शकतो. नखांचा मधला भाग आतल्या बाजूला दबलेला आणि कडा वरच्या दिशेने वळलेल्या दिसतात. या स्थितीला 'कोइलोनिकिया' किंवा स्पून नेल्स असे म्हणतात. हे लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अॅनिमियाचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते.

नखांवर उभ्या रेषा दिसू लागतात

लोहाच्या कमतरतेमुळे काही व्यक्तींच्या नखांमध्ये उभ्या रेषा किंवा खडबडीतपणा जाणवू शकतो. मात्र, नखांवरील रेषा ही केवळ लोहाच्या कमतरतेमुळेच तयार होतात असे नाही. वय आणि इतर आरोग्यविषयक समस्यांमुळेही असे बदल होऊ शकतात.

पायांच्या नखांवरही होतो परिणाम

लोहाच्या कमतरतेचा परिणाम केवळ हातांच्या नखांवरच नाही, तर पायांच्या नखांवरही दिसू शकतो. पायांची नखे ठिसूळ होणे, त्यांचा आकार बदलणे किंवा वाढ मंदावणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Changes in Nail Shape and Color as Warning Signs of Iron Deficiency
Health Tips : भात खाल्ल्यानंतर लगेच झोप येतेय? शरीरात नक्की काय घडतं, जाणून घ्या

लोहाची कमतरता दूर करण्यासाठी काय खावे?

आहारात हिरव्या पालेभाज्या, चणे, राजमा, मसूर, तीळ, सुकामेवा आणि लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. लोहाचे शोषण चांगले होण्यासाठी आवळा, लिंबू, संत्री यांसारखे व्हिटॅमिन C युक्त पदार्थ खावेत.

नखांमध्ये बदल दिसल्यास काय करावे?

नखांचा आकार किंवा रंग बदलल्यास केवळ त्यावरून लोहाची कमतरता असल्याचे निश्चित करता येत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार हिमोग्लोबिन आणि सीरम फेरिटिनसारख्या रक्तचाचण्या करून घ्याव्यात. स्वतःहून आयर्नच्या गोळ्या घेऊ नयेत.

टीप : ही माहिती सामान्य माहितीवर आहे. नखांमध्ये बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.