Stress And Diabetes : जास्त टेन्शन घेता? सावधान! होऊ शकतो मधुमेहाचा धोका? जाणून घ्या तज्ज्ञांकडून महत्त्वाची माहिती

Mental stress blood sugar spike : सततच्या ताणामुळे रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊन मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता असते. तणाव आणि मधुमेहाचा नेमका संबंध काय जाणून घ्या
how does overthinking and anxiety impact blood sugar levels
how does overthinking and anxiety impact blood sugar levelssaam tv
Published On: 

आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक चिंता यामुळे अनेकजण मानसिक तणावाचा सामना करत आहेत. मात्र, सततचा तणाव केवळ मानसिक आरोग्यावरच नाही, तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. विशेष म्हणजे, दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता असते. तणावामुळे शरीरातील काही हार्मोन्समध्ये बदल होतात आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जाणून घेऊया तणाव आणि मधुमेह यांचा काय संबंध आहे.

तणावामुळे रक्तातील साखर का वाढते?

जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली असते, तेव्हा शरीरात कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिन या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या हार्मोन्समुळे यकृताला अधिक ग्लुकोज रक्तात सोडण्याचे संकेत मिळतात. त्यामुळे शरीराला तणावाचा सामना करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा मिळते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

how does overthinking and anxiety impact blood sugar levels
Health Tips : भात खाल्ल्यानंतर लगेच झोप येतेय? शरीरात नक्की काय घडतं, जाणून घ्या

इन्सुलिन रेसिस्टन्सचा धोका

दीर्घकाळ मानसिक तणाव राहिल्यास शरीरातील इन्सुलिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. इन्सुलिन हे हार्मोन रक्तातील ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. मात्र, पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसतील, तर त्याला इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणतात. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

तणावामुळे खाण्याच्या सवयी बदलतात

काही लोक मानसिक तणावात असताना गरजेपेक्षा जास्त खातात. विशेषतः गोड पदार्थ, फास्ट फूड आणि जास्त कॅलरी असलेल्या पदार्थांचे सेवन वाढते. यामुळे वजन वाढू शकते आणि लठ्ठपणामुळे मधुमेहाचा धोका अधिक वाढतो.

how does overthinking and anxiety impact blood sugar levels
Health Tips : हिवाळ्यात कोणतीही लक्षणे नसतानाही रक्तदाब का वाढतो? तज्ज्ञांनी सांगितली ही कारणे

तणाव कमी करण्यासाठी काय करावे?

  • दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे.

  • नियमित ७ ते ९ तास झोप घेणे.

  • दररोज १० ते १५ मिनिटे दीर्घ श्वसनाचा सराव करणे.

  • आहारात फळे, भाज्या, डाळी आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करणे.

  • गोड पदार्थ आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ कमी खाणे.

  • मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तातील साखर आणि HbA1c तपासणी करणे.

केवळ मानसिक तणावामुळे मधुमेह होतो असे नाही. आनुवंशिकता, वाढते वजन, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि वय अशा अनेक घटकांमुळे मधुमेहाचा धोका वाढतो. मात्र, दीर्घकाळचा तणाव या धोक्यात भर घालू शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.