Nauvari Saree Draping: नऊवारी साडी नेसताना गोंधळ होतोय? या ७ सोप्या स्टेप्स फॉलो करुन नेसा परफेक्ट साडी

Shruti Vilas Kadam

सर्वप्रथम योग्य नऊवारी साडी निवडा

नऊवारी साडी नेसण्यासाठी सर्वप्रथम आवडीची साडी निवडा. पैठणी, कॉटन, सिल्क किंवा पारंपरिक काठापदराची नऊवारी साडी तुम्ही निवडू शकता.

Nauvari saree | pinterest

कंबरेभोवती साडी गुंडाळा

साडीचा एक टोक हातात घेऊन कमरेभोवती गुंडाळण्यास सुरुवात करा. साडीचा पदर खांद्यावर घेण्यासाठी पुरेसे कापड बाजूला ठेवा.

Nauvari Saree

कंबरेला साडीचा पदर खोचा

साडीचा पहिला पदर कमरेच्या एका बाजूला व्यवस्थित खोचा. साडी सैल होणार नाही याची काळजी घ्या.

Nauvari Saree Draping | pinterest

मागच्या बाजूने साडी नेसा

उरलेले कापड पाठीमागून पुढे आणा आणि कमरेभोवती व्यवस्थित गुंडाळा. यामुळे नऊवारी साडीचा पारंपरिक आकार तयार होतो.

Nauvari Saree For Bride

पायांमध्ये काचा घाला

साडीचा खालचा भाग पायांच्या मधून मागच्या बाजूला घेऊन जा. त्याच्या व्यवस्थित काचा घालून त्या कमरेच्या मागील बाजूस खोचा.

Nauvari Saree Draping | Saam Tv

सुंदर पदर तयार करा

साडीचा उरलेला भाग खांद्यावर घेऊन त्याच्या व्यवस्थित घड्या घाला. पदर खांद्यावर पिनने सुरक्षित करा.

Nauvari Saree Draping

नऊवारी लूकला दागिन्यांची जोड द्या

नऊवारी साडीवर नथ, ठुशी, चंद्रहार, हिरव्या बांगड्या आणि अंबाड्यात गजरा माळा. कपाळावर चंद्रकोर लावून तुमचा मराठमोळा लूक पूर्ण करा.

Nauvari Saree Draping

Gulab Pani: बाजारातील रोज वॉटर विसरा! घरच्या घरी फक्त २ पदार्थांपासून बनवा सुगंधी गुलाबजल

Gulab Pani | Saam TV
येथे क्लिक करा