Newly Married Bride: लग्नानंतर नव्या नवरीने सासरी गेल्यावर करू नयेत या चुका; सुखी संसारासाठी ४ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Newly Married Bride Tips: लग्नानंतर सासरी जाताना नव्या नवरीने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? नवीन घरातील माणसांशी जुळवून घेताना करिअर, आरोग्य आणि स्वतःची ओळख जपण्यासाठी जाणून घ्या चार महत्त्वाच्या टिप्स.
Newly Married Bride Tips
Newly Married Bride TipsSaam Tv
Published On: 

Newly Married Bride: दिवाळी संपली असून आता लवकरच लग्नसराईला सुरुवात होणार आहे. लग्न म्हटलं की नवरा-नवरीच्या घरात आनंदाचं वातावरण असतं. लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत अनेक स्वप्नं रंगवली जातात. खरेदी, मेहंदी, संगीत, हळद आणि लग्नाच्या विधींमध्ये दिवस कसे निघून जातात हे समजतही नाही. मात्र, लग्नानंतर सुरू होतो तो खऱ्या संसाराचा प्रवास! चित्रपट आणि मालिकांमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्ष आयुष्यात प्रत्येक गोष्ट सहज आणि सोपी नसते. विशेषतः नव्या नवरीला लग्नानंतर नवीन घर, नवीन माणसं आणि नवीन वातावरणाशी जुळवून घ्यावं लागतं. या काळात तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या येतात. मात्र, घर सांभाळताना स्वतःची ओळख, करिअर आणि आवडी-निवडी हरवू देऊ नयेत. लग्नानंतर सासरी जाताना नव्या नवरीने काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या कोणत्या ते जाणून घेऊया.

इतरांच्या बोलण्यावरून घरच्यांबद्दल मत बनवू नका

लग्नानंतर काही नातेवाईक किंवा आजूबाजूचे लोक तुम्हाला सासरच्या मंडळींबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकतात. त्यामध्ये काही चांगल्या तर काही नकारात्मक गोष्टी असू शकतात. मात्र, इतरांच्या बोलण्यावरून सासरच्या माणसांबद्दल लगेच मत बनवू नका. त्यांच्यासोबत स्वतःचा अनुभव घ्या आणि त्यानुसार नात्यांमध्ये विश्वास निर्माण करा.

Newly Married Bride Tips
Gun Master G9 Review: इम्रान हाश्मीचा 'गन मास्टर जी९' थिएटरमध्ये पास की फेल? प्रेक्षकांनी सांगितला कसा वाटला सिनेमा

घर सांभाळताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका

सून म्हणून घरातील काही जबाबदाऱ्या सांभाळणं महत्त्वाचं आहे. मात्र, या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःचं करिअर, आवडीनिवडी आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. घरातील सर्व जबाबदाऱ्या एकाच वेळी स्वतःवर घेण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्ट हळूहळू समजून घ्या आणि स्वतःसाठीही वेळ काढा.

Newly Married Bride Tips
Eetha movie: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रचला इतिहास; 'जी जी रे जी' गाण्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

नवीन घरातील माणसांचे स्वभाव समजून घ्या

माहेरी आपण अगदी मोकळेपणाने बोलतो आणि वागतो. मात्र, लग्नानंतर नवीन घरात जाताना तिथल्या माणसांचे स्वभाव आणि विचार समजून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला प्रत्येकाची बोलण्याची आणि वागण्याची पद्धत समजून घ्या. एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्या. यामुळे नवीन नात्यांमध्ये आपुलकी निर्माण होण्यास मदत होईल.

आपल्या मर्यादा आणि अपेक्षा स्पष्टपणे सांगा

लग्नानंतर करिअर आणि घर या दोन्ही गोष्टी सांभाळताना काही अडचणी येऊ शकतात. अशावेळी तुम्हाला घरासाठी काय करणं शक्य आहे आणि काय करणं शक्य नाही, हे घरातील मंडळींना शांतपणे समजावून सांगा. आपल्या अपेक्षा, अडचणी आणि आवडी त्यांच्यासोबत शेअर करा. संवाद आणि सामंजस्य ठेवल्यास अनेक गैरसमज आणि मतभेद टाळता येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.