Gun Master G9 Review: इम्रान हाश्मीचा 'गन मास्टर जी९' थिएटरमध्ये पास की फेल? प्रेक्षकांनी सांगितला कसा वाटला सिनेमा

Gun Master G9 Review: इम्रान हाश्मीचा गन मास्टर जी९ चित्रपट प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. जेनेलिया आणि अपारशक्तीच्या अभिनयाचे कौतुक, तर कथानकावर काही प्रेक्षकांनी टीका केली आहे.
Gun Master G9 Review
Gun Master G9 ReviewSaam Tv
Published On: 

Gun Master G9 Review: बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांचा बहुचर्चित 'गन मास्टर जी९' (Gun Master G9) हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनानंतर या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, प्रेक्षकांनी इम्रान हाश्मीचा दमदार अंदाज, जेनेलियाचा अभिनय आणि अपारशक्ती खुरानाच्या खलनायक भूमिकेचे कौतुक केले आहे. काही प्रेक्षकांनी चित्रपटातील ॲक्शन सीन्सचेही विशेष कौतुक केले आहे. मात्र, काहींनी चित्रपटाची गोष्ट एवढी आवडली नाही. तर पाहुयात या चित्रपटाचा प्रेक्षकांनी दिलेली रिव्ह्यू

प्रेक्षकांना कसा वाटला 'गन मास्टर जी९'?

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपापल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका प्रेक्षकाने चित्रपटाचे कौतुक करताना म्हटले की, इम्रान हाश्मीच्या दमदार अभिनयामुळे ९० च्या त्याच्या चित्रपटांची आठवण होते. तसेच जेनेलिया देशमुखने साकारलेली 'आरती'ची भूमिका सुंदर आहे.याशिवाय, अपारशक्ती खुरानाने 'देशू राठी' ही भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. चित्रपटातील हिमेश रेशमियाचे संगीतही अप्रतिम आहे.

Gun Master G9 Review
Eetha movie: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रचला इतिहास; 'जी जी रे जी' गाण्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

जेनेलिया आणि अपारशक्तीच्या अभिनयाची चर्चा

दुसऱ्या एका सोशल मीडिया युजरने 'गन मास्टर जी९'ला परिपूर्ण देसी मसाला चित्रपट म्हटले आहे. जेनेलियाचे सौंदर्य आणि खलनायकाच्या भूमिकेतील अपारशक्तीचा अभिनय उत्तम असल्याचे एका नेटकऱ्याने लिहीले. दिग्दर्शक आदित्य दत्त यांनी मनोरंजनाची योग्य मेजवानी दिली आहे असे एक युजरने म्हटले.

Gun Master G9 Review
Bigg Boss 20: गुल्लूने कनिका मानसाठी सोडली कॅप्टन्सी; मित्राचा निर्णय पाहून वॉशरूममध्ये रडू लागली अभिनेत्री

काही प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी

एकीकडे चित्रपटाचे कौतुक होत असताना दुसरीकडे काही प्रेक्षकांनी त्यातील कमतरताही दाखवून दिल्या आहेत. एका प्रेक्षकाच्या मते, हा चित्रपट नेहमीच्या गँगस्टर ड्रामासारखा वाटतो. चित्रपटातील ॲक्शन सीन्स अतिशय लाउड आहेत. एकाने लिहिले, स्टोरीत या घडणार हे आधीच ओळखता येते त्यामुळे सस्पेन्स असा राहत नाही.

'गन मास्टर जी९'ची टीम कोणती?

या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले आहे. तर हिमेश रेशमियाने चित्रपटाला संगीत दिले आहे. दीपक मुकुट, संगीता अहीर आणि हुनर ​​मुकुट यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'आवारापन २'च्या यशानंतर इम्रान हाश्मीकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. आता सोशल मीडियावरील या प्रतिक्रियांचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.