Bigg Boss 20: गुल्लूने कनिका मानसाठी सोडली कॅप्टन्सी; मित्राचा निर्णय पाहून वॉशरूममध्ये रडू लागली अभिनेत्री

Bigg Boss 20: बिग बॉस २० मध्ये गुल्लूने कनिका मानसाठी कॅप्टन्सी सोडली. मित्राचा निर्णय पाहून कनिका भावूक झाली आणि वॉशरूममध्ये जाऊन रडू लागली. घरात आता नव्या वादांची शक्यता आहे.
Bigg boss 20
Bigg boss 20
Published On: 

Bigg Boss 20: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस २०' सध्या स्पर्धकांमधील मैत्री, वाद आणि भावनिक प्रसंगांमुळे चर्चेत आहे. कलर्स टीव्ही आणि जिओहॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये कनिका मान आणि गुल्लू यांच्या मैत्रीची विशेष चर्चा रंगली आहे. नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये गुल्लूने कनिकासाठी स्वतःच्या कॅप्टन्सीचा त्याग केला. मित्राने दाखवलेली ही मैत्री पाहून कनिका भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले. वॉशरूममध्ये जाऊन ती ढसाढसा रडू लागली. या प्रसंगाने घरातील इतर स्पर्धकांचेही लक्ष वेधून घेतले.

कॅप्टन्सी टास्कमध्ये रंगला सामना

बिग बॉसच्या घरात नुकताच कॅप्टन्सीचा टास्क पार पडला. या टास्कसाठी स्पर्धकांना 'टीम ए' आणि 'टीम बी' अशा दोन गटांमध्ये विभागण्यात आले होते. गुल्लू, कनिका मान आणि स्काउट ओपी हे एकाच टीममध्ये होते. या तिघांनी मिळून टास्क जिंकला. त्यानंतर बिग बॉसने या तिघांना घरातील नवीन कॅप्टन निवडण्याची संधी दिली.

Bigg boss 20
अमिताभ बच्चन यांना पाचव्यांदा घरावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी; दिलजीतच्या शोवरून ३० दिवस ग्रेनेड हल्ल्यांचा इशारा!

गुल्लूने कनिकासाठी घेतला मोठा निर्णय

स्काउट ओपीवर आधीपासून काही पेनल्टी असल्यामुळे तो कॅप्टन पदासाठी पात्र नव्हता. त्यामुळे गुल्लू आणि कनिका यांच्यात कॅप्टन्सीची संधी होती. कनिकाची इच्छा होती की गुल्लूने घराचा कॅप्टन व्हावे. स्काउट ओपीनेही कनिकाला पाठिंबा दिला. मात्र, गुल्लूने स्वतःहून मागे हटत कनिका मानला कॅप्टन बनवण्याची इच्छा व्यक्त केली. मैत्रीला प्राधान्य देत त्याने कॅप्टन्सीची संधी कनिकाला दिली.

Bigg boss 20
Diljit Dosanjh Concert: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला मनसेचा विरोध; कार्यक्रम रद्द करण्याची मागणी, रास्ता रोकोचा इशारा

वॉशरूममध्ये कनिकाला अश्रू अनावर

गुल्लूने आपल्यासाठी कॅप्टन्सीचा त्याग केल्याने कनिका भावूक झाली. तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत. ती थेट वॉशरूममध्ये गेली आणि तिथे रडू लागली. यावेळी लवप्रीत वॉशरूमच्या बाहेर उभी राहून तिला समजावण्याचा आणि धीर देण्याचा प्रयत्न करत होता. गुल्लूच्या या निर्णयामुळे कनिका किती भावूक झाली, हे या प्रसंगातून पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.