अमिताभ बच्चन यांना पाचव्यांदा घरावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी; दिलजीतच्या शोवरून ३० दिवस ग्रेनेड हल्ल्यांचा इशारा!

Amitabh Bachchan: मुंबईत अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला आणि दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. बीएमसी मुख्यालय आणि मुंबई मेट्रोलाही टार्गेट करण्याचा ईमेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSaam Tv
Published On: 

Amitabh Bachchan: २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान 'जलसा' आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा मुंबईतील कॉन्सर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर कार्यालयातील अधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये बीएमसी मुख्यालय, मुंबई मेट्रो नेटवर्क आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांनाही टार्गेट करण्याचा उल्लेख आहे. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

दिलजीतच्या कॉन्सर्टवर हल्ल्याची धमकी

दिलजीत दोसांझ याचा मुंबईतील कॉन्सर्ट २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाला टार्गेट करण्याची धमकी ईमेलमधून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या ईमेलमध्ये खलिस्तान चळवळ आणि १९८४ मधील शीखविरोधी दंगलींचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच 'बब्बर खालसा (परमार-कॅनडा)' आणि 'खलिस्तान नॅशनल आर्मी' या संघटनांचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे. ईमेलमध्ये दिलजीतचा कार्यक्रम मुंबईत पार पडल्यास शहरात सलग ३० दिवस ग्रेनेड हल्ले घडवून आणण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Amitabh Bachchan
Shraddha Kapoor: ईठा चित्रपटात श्रद्धा कपूरचा शाही लावणी लूक; नऊवारी साडी आणि सुंदर दागिन्यांनी खुललं सौंदर्य

अमिताभ बच्चन यांना वारंवार धमक्या

अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान 'जलसा'ला यापूर्वीही बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. आता आलेली धमकी ही पाचवी धमकी असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी १२ नोव्हेंबर रोजी आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, महालक्ष्मी रेसकोर्स, महापौर कार्यालय, जलसा बंगला आणि पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेला टार्गेट करण्याचा उल्लेख होता.

Amitabh Bachchan
Diljit Dosanjh Concert: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला मनसेचा विरोध; कार्यक्रम रद्द करण्याची मागणी, रास्ता रोकोचा इशारा

अभिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनाही धमकी

दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी गँगस्टर गोल्डी ढिल्लन याने अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आला होता. बुलेटप्रूफ केबिन उभारल्या तरी गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली होती.

बंगळुरूतील कॉन्सर्टलाही बॉम्बस्फोटाची धमकी

दिलजीतच्या मुंबईतील कार्यक्रमापूर्वी बंगळुरूतील कॉन्सर्टलाही धमकी मिळाली होती. २९ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमधील मादवारा येथील 'नाइस ग्राऊंड्स'वर त्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान आयईडी (IED) स्फोट घडवून आणण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. त्यामुळे मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही शहरांमधील कार्यक्रमांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.