सोलापूर जिल्हा बँकेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता; काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव, विजेत्यांची यादी एका क्लिकवर

Solapur District Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. १९ पैकी १८ जागांवर भाजपप्रणीत आघाडीचे वर्चस्व राहिले, तर माळशिरस मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले.
Solapur Bank Election Result: सोलापूर बँक निवडणुकीत भाजपला मोठं यश, १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय
Solapur Bank Election ResultSaam Tv
Published On: 

भरत नागणे, पंढरपूर

संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने पहिल्यांदाच सत्ता काबीज केली आहे. एकूण १९ जागांपैकी १८ जागांवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे, तर केवळ एका जागेवर मोहिते-पाटील गटाला यश मिळाले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे ११ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित नऊ जागांसाठी बुधवारी मतदान झाले आणि आज मतमोजणी पूर्ण झाली. यामध्ये माळशिरस सोसायटी मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते-पाटील हे निवडून आले असून भाजपचे बाबाराजे देशमुख यांचा पराभव झाला आहे. इतर आठ जागांवर मात्र भाजपप्रणीत आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला.

प्रथमच बँकेवर भाजपची सत्ता आल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे. यापूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपने बाजी मारली होती. त्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जिल्हा बँकही भाजपने हिसकावून घेतली आहे. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे यांचे पुत्र सूर्यादित्य साळुंखे आणि माजी आमदार श्यामल बागल या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे आणि बँकेचे माजी अध्यक्ष रणजितसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रतिष्ठेची केली होती. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री दमबाजी करत असल्याचा आरोप केला होता, तर पालकमंत्र्यांनी देखील मोहिते-पाटील यांना 'चोर' असे संबोधले होते. त्यामुळे निकालापूर्वीच पालकमंत्री आणि मोहिते-पाटील यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले होते.

Solapur Bank Election Result: सोलापूर बँक निवडणुकीत भाजपला मोठं यश, १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाड यांचे मोठे विधान

सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले उमेदवार:

आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रशांत परिचारक, आमदार राजेंद्र राऊत, शंभुराजे जगताप, सिद्धेश्वर आवताडे, यशवंत संजय शिंदे, पृथ्वीराज दिलीप माने, विक्रांत राजन पाटील, अजिंक्यराणा राजन पाटील, सुदीप सुरेश हसापुरे आदी अकरा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

तसेच, आज झालेल्या मतमोजणीमध्ये श्यामल बागल, अर्चना घाडगे, आमदार बाबासाहेब देशमुख, सूर्यादित्य साळुंखे, मनीष देशमुख, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह बबनराव शिंदे आणि राजेंद्र बंदीछोडे हे मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. जिल्हा बँक भाजपच्या हाती गेल्याने जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Solapur Bank Election Result: सोलापूर बँक निवडणुकीत भाजपला मोठं यश, १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय
Delimitation Bill : 'डिलिमिटेशन'वरून इंडिया आघाडीचे 'लिमिटेशन'; 4 पक्षांचा अचानक सूर बदलला, NDA संख्याबळ गाठणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.