Delimitation Bill : 'डिलिमिटेशन'वरून इंडिया आघाडीचे 'लिमिटेशन'; 4 पक्षांचा अचानक सूर बदलला, NDA संख्याबळ गाठणार?

Delimitation Bill latest news : डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीएला दोन-तृतीयांश बहुमताची गरज आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी, आरजेडी, डीएमके आणि वायएसआरसीपी पाठिंबा देणार असल्याची चर्चा; जाणून घ्या लोकसभेतील मतांचं गणित.
Modi Government
modi government Saam tv
Published On: 

INDIA Alliance Parties : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. आता ३० तारखेला हे विधेयक संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीएला ३६० खासदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. पावसाळी अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन) विधेयक संसदेत सादर केले होते; पण केंद्र सरकारकडे दोन-तृतीयांश बहुमत नसल्यामुळे ते मंजूर झाले नाही. आता पुन्हा एकदा सरकारने हे विधेयक सादर करण्यासाठी पावले उचलली आहेत. भाजपप्रणित एनडीएला विरोधकांमधील ४ पक्षांना मनवण्यात यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

डिलिमिटेशन विधेयक मंजूर झालं तर प्रत्येक राज्याच्या 50 % जागा वाढणार आहेत. या प्रस्तावित विधेयकात लोकसभेच्या जागा ८५० पर्यंत वाढवणार आहेत. हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांच्या गणितावरून आणि काही विरोधी पक्षांच्या संभाव्य भूमिकेवरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षातील ४ महत्त्वाच्या पक्षानं अचानक सूर बदलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजप प्रणित एनडीएने विधेयक मंजूर करण्यासाठी दोन तृतियांश खासदारांचा पाठिंबा मिळवला असल्याचे सांगितले जात आहे.

या विधेयकांवर 'इंडिया' आघाडीतील काही पक्ष संसदेत वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशी राजकीय चर्चा रंगली आहे. पण कोणत्याही पक्षाने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) सर्वाधिक चर्चेत आहे. ८ खासदार असलेला हा पक्ष एनडीएच्या वतीने मांडल्या जाणाऱ्या विधेयकाच्या बाजूने मतदान करू शकतो, असे बोलले जात आहे. आरजेडीही या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, अशी चर्चा आहे. आरजेडीचे लोकसभेचे ४ खासदार आहेत. त्याशिवाय, डीएमके आणि वायएसआरसीपी हे पक्षदेखील घटनादुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देऊ शकतात. या दोन्ही पक्षांनी अद्याप उघडपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. पण हे दोन्ही पक्ष कोणत्याही आघाडीत सामील नाहीत. लोकसभेत डीएमकेचे २२ खासदार आहेत, तर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीचे ४ लोकसभा सदस्य आहेत.

Modi Government
डिलिमिटेशन विधेयकाला केंद्राची मंजुरी; लोकसभेच्या किती जागा वाढणार, कुणाचा पाठिंबा, कुणाचा विरोध, पुढे काय होणार?

एनडीएच्या बाजूने सध्या किती खासदार आहेत?

लोकसभेत भाजप २४१ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 'पीटीआय'च्या माहितीनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सध्या ३२० खासदारांचा पाठिंबा आहे. ५४० सदस्यसंख्या असलेल्या सध्याच्या सभागृहात सर्व सदस्यांनी मतदान केल्यास हे विधेयक मंजूर होण्यासाठी ३६० मतांची आवश्यकता असेल. 'पीटीआय'नुसार, सरकारमधील एका अधिकाऱ्याने हे विधेयक १५ ते १८ मतांच्या फरकाने मंजूर होईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, एप्रिलमध्ये झालेल्या विधेयकावरील मतदानाच्या वेळी एनडीएला धक्का बसला होता.

Modi Government
Heart Health : रनिंग केल्याने बीपी झटक्यात कमी होतो? आठवड्याला किती मिनिटे पळायला हवे? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.