Police investigation underway after two young women were found dead inside the bathroom of a Swaminarayan temple complex in Surat Saam Tv
देश विदेश

Chat GPT ला विचारलं आत्महत्या कशी करायची? स्वामीनारायण मंदिरात आढळले दोन तरुणींचे मृतदेह

Two College Girls Found Dead In Swaminarayan Temple Surat: सुरतमधील दिंडोली परिसरातील स्वामीनारायण मंदिरात दोन तरुणींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोघी बालमैत्रिणी असून त्यांच्या मोबाईलमध्ये आत्महत्येबाबत ऑनलाईन शोध घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Omkar Sonawane

सुरतमधील दिंडोली येथील स्वामीनारायण मंदिर संकुलातील बाथरूममध्ये दोन तरुणींचे मृतदेह आढळले आहे. दिंडोलीच्या रामी पार्क सोसायटीमध्ये राहणाऱ्या बालपणीच्या मैत्रिणी रोशनी सिरसाठ आणि ज्योत्स्ना चौधरी अशी त्यांची ओळख पटली आहे. घरी येण्याची वेळ होऊनही या दोघी परतल्या नसल्याने तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी पोलिस स्टेशनमध्ये जात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता मंदिराच्या बाथरूममध्ये दोन्ही महिलांचे मृतदेह आढळले. तपासात असे दिसून आले की मुलींनी चॅट जीपीटीला Chat Gpt आत्महत्येचा मार्ग विचारला होता.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघी ही सोबत कॉलेजला जात असे. घरी यायची वेळ उलटूनही दोघी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी तरुणींना फोन केले. पण त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपास सुरू केला.

पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने तरुणींना ट्रॅक केले आणि या दोघींचा मृतदेह स्वामीनारायण मंदिरात आढळले. पोलिस आणि कुटुंबातील सदस्य हे मंदिर परिसरात पोहोचले तेव्हा त्यांना या दोघींची स्कूटी आढळली. मंदिरातील सीसीटीव्ही चेक केला असता या दोघी बाथरूममध्ये जाताना दिसल्या. बाथरूममध्ये पोलिसांनी जाऊन बघितले तर दरवाजा बंद होता. त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा दोघींचेही मृतदेह बाथरूममध्ये आढळले. हे दृश्य पाहून कुटुंबियांसाह पोलिसांना देखील मोठा धक्का बसला.

दोघींच्या मृतदेहाजवळ एक भरलेली क्लोरोफॉर्म बाटली, एक रिकामी बाटली आणि इंजेक्शन देखील आढळली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. सुरतचे एसीपी नीरव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात दोन्ही मुली लहानपणापासून मैत्रीण आहेत. दोघी कायम एकाच स्कूटीवर कॉलेजला जायच्या. दोघींच्या मृतदेहा भोवती एनेस्थिटीयाची भरलेली आणि एक रिकामी बाटली आढळली.

दोघांच्याही मोबाईल फोनच्या प्राथमिक तपासात त्यांनी चॅट जीपीटीला विचारले की आत्महत्या कशी करावी, कोणते विष वापरावे आणि ते कसे घ्यावे याबद्दल माहिती सर्च केली होती. या घटनेमुळे सूरत हादरले असून पोलिस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांचा वाद पुन्हा चिघळला; उपमुख्यमंत्री शिंदेंकडे केली मोठी मागणी

Maharashtra Live News Update : अंबरनाथ आनंद नगर येथे एकापाठोपाठ 3-4 कंपनीमध्ये भीषण आग

Jeera Ajwain Water Benefits: रोज सकाळी उठल्यावर जीरा ओवा पाणी प्यायल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

Kolhapur Tourism : रोड ट्रिपसाठी 'हे' आहे महाराष्ट्रातील सुंदर ठिकाण, कोल्हापूर ते कोकण प्रवास आयुष्यभर स्मरणात राहील

Dadpe pohe Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी तयार करा महाराष्ट्रीयन स्पेशल दडपे पोहे, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT