Jalgaon: पोलिस दलात खळबळ! जळगावमध्ये पोलिसाची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास

Jalgaon Police Constable End Life: जळगावमध्ये पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली. राहत्या घरी या पोलिसांने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे जळगाव पोलिस दलात खळबळ उडाली.
Jalgaon: पोलिस दलात खळबळ! जळगावमध्ये पोलिसाची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास
Jalgaon Police Constable End LifeSaam Tv
Published On

Summary -

  • जळगावमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली

  • कोदगाव येथील राहत्या घरी गळफास घेतला

  • पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला

  • आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट

संजय महाजन, जळगाव

जळगावमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्य पोलिस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचत आयुष्य संपवले. चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथील राहत्या घरामध्ये त्यांनी गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे जळगाव पोलिस दलात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. निलेश पाटील असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव होते. कोदगावातील राहत्या घरामध्ये गळाफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. निलेश पाटील यांचा मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. निलेश पाटील यांच्या आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट आहे.

Jalgaon: पोलिस दलात खळबळ! जळगावमध्ये पोलिसाची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास
Jalgaon Crime: जळगावात 'खुनी राजकारण'! सरपंच-उपसरपंचाला चिरडण्याचा डाव; सुपारी घेऊन अंगावर घातली पिकअप

निलेश पाटील यांच्या कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निलेश यांचा मृतदेह खाली उतरवून चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांना निलेश यांच्या घरामध्ये सुसाईड नोट मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली? यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. निलेश पाटील नैराश्येत किंवा तणावात होते का? याचा तपास पोलिस करत आहेत.

Jalgaon: पोलिस दलात खळबळ! जळगावमध्ये पोलिसाची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास
Jalna–Jalgaon Railway Project: जालना ते जळगाव धावणार रेल्वे; ५,८०४ कोटींचा निधी मंजूर, १७ स्थानके असणारा नवा रेल्वे मार्ग कसा असेल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com