भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा कार अपघातात मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Senior BJP Leader Shyam Sahu Dies In Chhindwara Road Accident: मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे भाजपचे ज्येष्ठ नेते शाम साहू यांचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला. नर्मदा स्नान करून परतत असताना त्यांच्या गाडीची आयशर ट्रकशी धडक झाली.
Senior BJP leader Shyam Sahu dies in a tragic car accident in Chhindwara, Madhya Pradesh while returning from Narmada river bath
Senior BJP leader Shyam Sahu dies in a tragic car accident in Chhindwara, Madhya Pradesh while returning from Narmada river bathSaam Tv
Published On

मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडामध्ये रविवारी कार अपघातात भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाले आहे. भाजप नेते शाम साहू हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत नर्मदा स्नान करून परतत असताना त्यांची गाडी समोरून येत असलेल्या आयशर ट्रकला धडकली आणि मोठा अपघात झाला. शाम साहू यांचे या अपघातात जागीच मृत्यू झाला आणि इतर कार्यकर्ते हे देखील गंभीर जखमी आहे. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Senior BJP leader Shyam Sahu dies in a tragic car accident in Chhindwara, Madhya Pradesh while returning from Narmada river bath
धावत्या ट्रेनमध्ये आशुतोष महाराजांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; बाथरुममध्ये लपून वाचवला जीव

प्रत्येक रविवारी नर्मदा नदीत जाऊन स्नान करत असे

शाम साहू हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. ते प्रत्येक रविवारी नर्मदानदीमध्ये स्नान करायला जात असे. नेहमीप्रमाणे काल देखील ते आपल्या कार्यकर्त्यासोबत नर्मदा नदीवर गेले होते आणि परतत असताना शाम साहू यांची गाडीने आयशरला धडक दिली. या अपघातात त्यांचे जागेवर निधन झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले आणि शाम साहू यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि जखमी कार्यकर्त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Senior BJP leader Shyam Sahu dies in a tragic car accident in Chhindwara, Madhya Pradesh while returning from Narmada river bath
मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

भाजपमध्ये शोककळा आणि कार्यकर्त्यांचा टाहो

भाजपचे ज्येष्ठ नेते शाम साहू यांच्या निधनाची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांना रडू कोसळले आणि कार्यकर्त्यांनी एकच टाहो फोडला. मध्यप्रदेशच्या भाजपच्या सर्व नेत्यांनी शोक व्यक्त केला असून राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com