

आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर धावत्या ट्रेनमध्ये हल्ला
हल्लेखोराने धारदार शस्त्राने आशुतोष यांचे नाक कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
आशुतोष यांनी बाथरूममध्ये लपून जीव वाचवल्याचा दावा
श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणावरून आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर धावत्या ट्रेनमध्ये जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. रीवा एक्स्प्रेसमध्ये आशुतोषवर धारदार शस्त्राने हल्ला करत नाक कापण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामागे स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि त्यांच्या सहकाऱ्याचा हात असल्याचा आरोप आशुतोष महाराजांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आशुतोष बह्मचारी यांच्या आरोपानुसार, ते रीवा एक्स्प्रेसहून प्रयागराजला निघाले होते. ट्रेन फतेहपूर आणि सिराथूदरम्यान पोहोचल्यानंतर टॉयलेटला जाण्यासाठी उतरले. त्यावेळी त्यांच्या धारदार शस्त्राने हल्ला झाला. हल्लेखोरांनी माझ्या नाकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शरीरांच्या अनेक ठिकाणी वार केल्याचे त्यांनी सांगितले. आशुतोष यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. हल्लेखोरांच्या हल्ल्यानंतर त्यांनी टॉयलेटमध्ये लपून जीव वाचवला. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली.
आशुतोष ब्रह्मचारी यांनी आरोप केला आहे की, 'माझे नाक कापणाऱ्यांना आधीच २१ लाख रुपये घोषित केलं होतं. या घोषणेनंतरच माझ्यावर हल्ला झाला'. हल्ला करण्याचं संपूर्ण षडयंत्र रचण्यात आलं होतं. यात अविमुक्तेश्वरानंद किंवा त्यांच्या सहकाऱ्याची हात असू शकतो. आरोपांची कसून चौकशी केली पाहिजे. हल्ला करताना एकच जण होता. हल्लेखोरांच्या हातात धारदार शस्त्रे होती. त्याने अनेकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
आशुतोष ब्रम्हचारी यांनी पोलिसांत जाऊन तक्रार दिली आहे. त्यांना मेडिकलमध्येही नेण्यात आलं आहे. त्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर हल्ल्याचा आरोप केला आहे. तक्रारीत म्हटलं आहे की, 'माझ्यावर सियासू स्टेशनवर धारदार शस्त्राने हल्ला केला. माझे नाक कापण्याचा प्रयत्न झाला. हल्लेखोर एकटाच होता'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.