

होळीच्या रंग फेकण्यावरून गाझीपूरमध्ये वाद
संतप्त तरुणाने बंदुकीने ५५ वर्षीय व्यक्तीवर केला गोळीबार
जखमी अवस्थेत व्यक्तीला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी केले मृत घोषित
उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्याच्या करंडा पोलीस स्टेशनच्या चाडीपूर गावात होळीच्या दिवशी झालेला वाद चांगलाच पेटला. या वादामुळे रविवारी रक्तरंजित थरार घडला. रंग अंगावर फेकल्याने भडकलेल्या तरुणाने लायसन्स बंदुकीने ५५ वर्षीय आस मोहम्मद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, मोहम्मद यांची छातीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या गोळीबारात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्तीला तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी व्यक्तीला मृत घोषित केलं.
पोलीस स्टेशनचे पदाधिकारी अशोक कुमार यांनी म्हटलं की, 'होळीच्या दिवशी लहान मुलांच्या रंग फेकवण्यावरून दोन गटात वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थली पोहोचून दोन्ही गटाचा वाद मिटवला. त्याच वादावरून रविवारी दोन्ही गटात बाचाबाची झाली. त्यानंतर ५५ वर्षीय व्यक्तीची हत्येची घटना घडली'.
मृत व्यक्तीचा मुलगा अरमानने सांगितलं की, 'माझे वडील आस मोहम्मद हे वीट भट्टीवर गेलो होते. तिथून घरी परतताना त्यांना ३ ते ४ लोकांनी घेरलं. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर घराजवळ येऊन गोळीबार केला. या हल्ल्यात मृत्यू झाला. यावेळी घराजवळ येऊन नारेबाजी देखील केली'.
गोळीबाराच्या घटनेनंतर गावात तणाव वाढला आहे. पोलिसांनी गावात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. राकेश कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, आम्ही वादावर लक्ष ठेवून आहोत. घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.