Writer Death: ज्येष्ठ पटकथा लेखक आणि ऑस्कर विजेते जेरेमी लार्नर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची बातमी दिली. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेरेमी लार्नर यांचे कॅलिफोर्नियातील ओकलंड येथे निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. जेरेमी लार्नर यांच्या निधनाचे कारण काय जाणून घ्या.
जेरेमी लार्नर यांचा आजार
जेरेमी लार्नर हे बऱ्याच काळापासून पार्किन्सन आजार आणि लिम्फोमाशी झुंज देत होते. त्यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. २४ फेब्रुवारी रोजी जेरेमी यांचे निधन झाले. हॉलिवूडमधील सेलिब्रिटी आणि प्रेक्षक त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
पत्रकार ते पटकथालेखक
१९३७ मध्ये न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या जेरेमी लार्नर यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९७२ च्या 'द कॅन्डिडेट' या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळाली. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथालेखकाचा ऑस्कर मिळाला.
जेरेमीला राजकारणाचीही खोल समज होती. त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार यूजीन मॅकार्थी यांच्यासाठी भाषणेही लिहिली. या अनुभवामुळे रॉबर्ट रेडफोर्ड-अभिनित 'द कॅन्डिडेट' चित्रपटाची कहाणी त्यांना लिहीता आली. जेरेमीने त्यांच्या कारकीर्दीत बिल ब्रॅडली आणि पॉल न्यूमन सारख्या सेलिब्रिटींसाठीही लिहिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.