Bollywood Celebrity: अमिताभ बच्चन ते सलमान खान; प्रॉपर्टी भाड्याने देऊन लाखो कमावतात हे बॉलिवूड सेलिब्रिटी

Shruti Vilas Kadam

सेलिब्रिटींसाठी प्रॉपर्टी हा मोठा उत्पन्नाचा स्रोत

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांकडे कोट्यवधींची आलिशान घरं आणि अपार्टमेंट्स आहेत. राहण्यासाठी एक घर वापरले जात असले तरी उर्वरित मालमत्ता भाड्याने देऊन ते महिन्याला लाखो रुपये कमावतात.

Salman Khan

अमिताभ बच्चन यांचीही मोठी कमाई

Amitabh Bachchan यांनी मुंबईतील त्यांच्या बंगल्याचा तळमजल्याचा भाग भाड्याने दिला आहे. या प्रॉपर्टीतून त्यांना दर महिन्याला सुमारे ९५ हजार रुपये भाडे मिळते.

Amitabh Bachchan | Instagram

सैफ अली खानचं वांद्रेतील अपार्टमेंट

Saif Ali Khanने वांद्रे येथील त्यांचे अपार्टमेंट एका कंपनीला भाड्याने दिले असून त्यातून त्यांना दर महिन्याला सुमारे ३.५ लाख रुपये मिळतात.

saif ali khan | yandex

जॉन अब्राहमची प्रॉपर्टी

John Abrahamने वांद्रे येथील अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. या प्रॉपर्टीतून त्यांना महिन्याला सुमारे ७.५ लाख रुपये भाडे मिळते.

John Abraham

रणबीर कपूरची पुण्यातील मालमत्ता

रणबीर कपूर याच्याकडे मुंबईसह पुण्यातही प्रॉपर्टी आहे. पुण्यातील एका टॉवरमधील फ्लॅट त्यांनी सुमारे ४ लाख रुपये महिन्याला भाड्याने दिला आहे.

Ranbir Kapoor

करिश्मा कपूरची प्रॉपर्टी

करिश्मा कपूरने वांद्रे येथील एक अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. या घरातून त्यांना दर महिन्याला सुमारे ५.५१ लाख रुपये उत्पन्न मिळते.

Karishma Kapoor

अजय देवगण-काजोलचीही प्रॉपर्टीतून कमाई

अजय देवगण आणि काजोल यांच्याकडे गोव्यातील व्हिला तसेच मुंबईतील मालमत्ता आहे. या प्रॉपर्टी भाड्याने देऊन तेही दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करतात.

Kajol And Ajay Devgan | Instagram

Paithani Saree Design: लग्नात ब्राइड्समेडसाठी नेसायला पैठणी साडीचे 'या' आहेत ७ ट्रेंडी आणि बजेटमध्ये सुंदर डिझाईन्स

Paithani Saree Design | Saam Tv
येथे क्लिक करा