सापांना पळवणाऱ्या छडीचा व्हायरल दावा चर्चेत
छडी कंपनाद्वारे सापांची उपस्थिती ओळखते
सध्या ही छडी बाजारात उपलब्ध नाही
शेतकऱ्यांसाठी भविष्यात उपयुक्त ठरण्याची शक्यता
आता दावा करण्यात आलाय की सापांना पळवून लावणारी छडी बाजारात आलीय. छडी दिसताच साप पळून जातात असा दावा केलाय.त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
हा व्हिडिओ पाहिलात. आता सापांना पळवून लावणारी छडी बाजारात आल्याचा दावा करण्यात आलाय. या छडीमुळे विषारी प्राणी, साप पळून जातात, असा दावा केलाय. पण, हे खरंच असेल तर देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. इतकंच नव्हे तर अनेकांना ही छडी उपयोगी पडू शकते. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली.
हा दावा केल्यामुळे आम्ही या छडीबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला...या व्हिडिओत थेट केंद्रीय कृषिमंत्रीच प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. त्यामुळे खरंच सापांना पळवून लावणारी छडी मार्केटमध्ये आलीय का...? ही छडी मार्केटमध्ये आली असेल तर तिची किंमत किती? छडी कुठे मिळेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. कारण, शेतकऱ्यांसह सामान्यांनाही या काठीचा उपयोग होऊ शकतो. साप चावल्यामुळे देशभरात लाखो लोकांचे मृत्यू झालेयत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...याआधी देशात सर्पदंशाच्या किती घटना घडल्यायत ते पाहुयात.
भारतात दरवर्षी 30 ते 40 लाख सर्पदंशाच्या घटना घडतात. वर्षाला अंदाजे 58 हजार लोकांचा मृत्यू होतो. यापैकी बहुसंख्य लोक शेतकरी असतात. या आकडेवारीवरून सापांचा किती धोका आहे हे कळून येतं. त्यामुळे आमच्या टीमने याबाबत सरकारकडूनच माहिती मिळवली.पुन्हा एकदा पाहुयात मंत्री काय सांगतायत.
त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात. शेतकरी छडी जमिनीवर ठेवून तिचे बटण दाबताच काम करते. 100 मीटरआत विषारी प्राणी, साप असल्यास छडी जोरात कंप पावते. छडीच्या कंपनामुळे शेतकऱ्यांना सावध होता येतं. छडीत एक सौर टॉर्च असल्याने अंधारात उजेड देते.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 'उन्नत कृषी महोत्सवा'दरम्यान ही माहिती दिली. सध्या ही छडी मार्केटमध्ये आलेली नाही...त्यावर सध्या काम सुरू असून, किंमतही लवकरच सांगितली जाणाराय. पण, ही छडी मार्केटमध्ये आल्यास कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होणाराय. त्यामुळे आमच्या पडताळणीत सापांना पळवून लावणारी छडी आल्याचा दावा सत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.