

अंदमान बेटाजवळील समुद्रात घडली भीषण दुर्घटना
२५० हून अधिक जण असलेले जहाज बुडाल्याची माहिती
दुर्घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण
अंदमान बेटाजवळील समुद्रात भीषण दुर्घटना घडली आहे. अंदमान बेटाजवळील समुद्रात एक जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास अडीचशे लोकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या जहाजात रोहिंग्या आणि निर्वासित बांगलादेशी नागरिकांचा समावेश होता. या भीषण घटनेने अंदमान बेटावर राहणाऱ्या लोकांमध्ये भीती पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण बांगलादेशच्या किनाऱ्यावरून निघालेल्या आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरलेले जहाज मलेशियाकडे जात असल्याचं वृत्त आहे. खवळलेल्या समुद्रात आणि वेगवान वाऱ्यामध्ये जहाज सापडलं. त्यानंतर हे जहाज ९ एप्रिल रोजी उलटल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत केवळ ९ जणांचा सुटका करण्यात यश आलं आहे.
म्यानमारमधून रोहिंग्या समाजाचे हजारो लोक इतरत्र स्थलांतरित होत असतात. ही लोक म्यानमारमधील जाचाला कंटाळलेले लोक जीव धोक्यात घालून दुसऱ्या देशात जातात. स्थलांतरित लोक दुसऱ्या देशात जाण्यासाठी नेहमी एखाद्या साधारण जहाजाचा वापर करतात.
म्यानमारच्या रखाइन राज्यातील सैन्य आणि रोहिंग्या समाजाच्या विद्रोही समूहाशी नेहमी वाद होत असतात. मिळालेल्या माहितीनुसार, २८० लोक जहाजात होते. ४ एप्रिल रोजी बांगलादेशातून हे जहाज निघालं'. 'UNHCR'ने स्पष्ट केलं आहे की, ही फार दु:खद घटना आहे. या समाजाला गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना स्थलांतरित व्हावे लागते'.
बांगलादेशच्या तटरक्षक दलाने स्पष्ट केलं आहे की, ९ एप्रिल रोजी इंडोनेशिया जवळून एका जहाजातील ९ लोकांना वाचवण्यात यश आलं. यात एका महिलेचाही समावेश आहे. बीसीजीचे प्रवक्ता लेफ्टनंट कमांडर सब्बीर आलम सुजान यांनी सांगितलं की, 'बांगलादेशाचा ध्वज एम. टी. मेघना प्राइडने अंदमान बेटाजवळ समुद्रात काही लोक पाण्यात तरंगताना दिसले. त्यानंतर तातडीने पाण्यातून बाहेर काढले. वाचवण्यात आलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.