गाजीपुरजवळ यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात
दोन महिलांचा मृत्यू, ३८ भाविक जखमी
तिघांची प्रकृती गंभीर, उपचार सुरू
प्रशासन व मंत्र्यांकडून मदतीचे निर्देश
संजय जाधव, बुलढाणा
Uttar Pradesh Gajipur Bus Accident 2 Dead काशि विश्वनाथ दर्शनासाठी नेपाळकडे जाणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात वाराणसी-गोरखपुर महामार्गावरील गाजीपुर जवळ झाला असून या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यु झाला आहे. यातील एक महिला बुलढाणा जिल्ह्यातील तर दुसरी महिला अकोला जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तसेच या अपघातात ३८ भाविक जखमी झाले आहे. जखमींना वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन अपघाताची माहिती मिळताच मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधुन जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
जय श्रीराम टुर्स एँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या वतीने आयोजीत केलेल्या देवदर्शन यात्रे निमीत्त महाराष्ट्रातील ३८ भाविक अयोध्या व इतर तिर्थक्षेत्र दर्शनाकरीता निघाले होते. यात्रेकरु भाविकांची बस वाराणसी-गोरखपुर या महामार्गाने मार्गक्रम करत असतांनाच सकाळच्या सुमारास उत्तर प्रदेशातील गाजीपुर जवळील नंदगज येथे बसचा अपघात घडला.
या अपघातामध्ये २ महिलांचा मृत्यू झाला. यामध्ये अकोला येथील ५० वर्षीय अन्नपुर्णाबाई तर बुलढाणा जिल्हयातील मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील सरस्वतीबाई पाखरे यांचा समावेश आहे. उर्वरीत ३५ यात्रेकरु या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर उर्वरीत ३२ यात्रेकरु किरकोळ जखमी आहेत.
अपघातीची माहिती मिळताच मंत्री प्रतापराव जाधव यांनी उत्तर प्रदेश राज्य सरकारडे संपर्क साधला व अपघातातील जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. केंद्रिय मंत्र्यांनी एवढयावरच न थांबता तेथील बुलढाणा जिल्हाधिकारी दिनेश कुमार, सिएमओ डॉ.सुनिल पांडे यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधुन जखमींना तात्काळ मदत करण्याचे सुचना दिल्या. केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांचे सहाय्यक खाजगी सचिव डॉ.गोपाल डिके, आचल भाटीया हे घटनास्थळी हे मदतीसाठी गाजीपुर कडे रवाना झाले आहेत. तर दिल्ली येथील मंत्रालयातुनही संबधितांना निर्देशित करुन अपघातग्रस्तांना मदत करण्याचे काम केल्या जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.