Kalyan : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे संपातजनक कृत्य, महिलेचा विनयभंग अन् नागरिकांना मारहाण; VIDEO समोर

Kalyan News : कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल सोसायटीत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने महिलेशी गैरवर्तन करत रहिवाशांवर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.
Kalyan : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे संपातजनक कृत्य, महिलेचा विनयभंग अन् नागरिकांना मारहाण; VIDEO समोर
Kalyan NewsSaam tv
Published On
Summary
  • कल्याण पश्चिमेत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा धुमाकूळ

  • महिलेशी गैरवर्तन आणि रहिवाशांवर मारहाण

  • संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण पश्चिमेतील एका हायप्रोफाईल सोसायटीत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. महिलांशी गैरवर्तन, अश्लील शिवीगाळ आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास वल्लभ टॉवर येथे राहणाऱ्या एक महिला लहान मुलाला घेऊन बाहेर जाण्यासाठी आपली दुचाकी पार्किंगमधून बाहेर काढत होत्या. यावेळी सोसायटीतच राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी बी. एल. पवार यांनी मुद्दाम आपली गाडी महिलेच्या गाडीमागे लावली. वारंवार हॉर्न वाजवूनही त्यांनी गाडी बाजूला घेतली नाही आणि तक्रारदार महिलेकडे पाहण्यास सुरुवात केली.

Kalyan : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे संपातजनक कृत्य, महिलेचा विनयभंग अन् नागरिकांना मारहाण; VIDEO समोर
Shocking : भाजीत केस आढळल्याने नवऱ्याकडून बेदम मारहाण, २५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; संभाजीनगर हादरले

यानंतर तिला शिवीगाळ केली. ​या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या हाणामारीत झाले. सोसायटीचे लोक जमा झाले असता, आरोपीने सर्वांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी सोसायटीतील महिला व इतर सदस्याने त्यांना विरोध केला असता त्यांना देखील शिवीगाळ केली, त्याचबरोबर त्यांना विरोध करणाऱ्या पुरुषांना देखील मारहाण केली.

Kalyan : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे संपातजनक कृत्य, महिलेचा विनयभंग अन् नागरिकांना मारहाण; VIDEO समोर
Pune : पुण्यात धक्कादायक प्रकार! व्हॉट्सॲपवर ग्रुप जॉईन करणं पडलं महागात, बँक खात्यातील १२ कोटी गायब

तक्रारदार महिलेचा विनयभंग करून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तिच्या चारित्र्याबद्दल घाणेरडे शब्द वापरले, असल्याचे आरोप करत तक्रार या महिलेने केली आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com