ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
साप हा सरपटणारा प्राणी आहे. हा माणसाठी घातक असतो. याचे अनेक प्रकार किंवा जाती असतात.
तुम्हाला माहितच असेल साप हा मांसाहारी आहे, जो उंदीर, बेडूक, लहान पक्षींची अंडी, अंडी, सरडे, मासे आणि इतर लहान सापही खातात.
उंदीरच उंदरालाच खात नाही मग साप दुसऱ्या सापाला कसं खातो? हा प्रश्न अनेकांच्या मनात आलेला असतो. चला आपण उत्तर सोप्या शब्दात जाणून घेऊयात.
निसर्गाच्या नियमानुसार 'स्वजातीला खाणे' ही गोष्ट आपल्याला विचित्र किंवा भयानक वाटू मात्र सापांच्या जगात ही एक 'धोरणात्मक' खेळी असल्याची माहिती मिळाली आहे.
'बायोलॉजिकल रिव्ह्यू' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, सापांच्या विविध प्रजातींमध्ये स्वजातीला खाण्याची प्रवृत्ती उत्क्रांतीच्या दरम्यान किमान ११ वेळा स्वतंत्रपणे विकसित झाली आहे.
जेव्हा सापाला पुरेसं अन्न मिळत नाही तेव्हा साप स्वत: च्याच प्रजातीच्या दुसऱ्या सापाला खातो.
ओपियोफॅगस प्रकारातला किंग कोब्रा इतर सापांनाही खाऊ शकतो. कोब्रा हा ज्या सापाची शिकार करतो त्यात क्रेट आणि इतर कोब्रा असे विषारी साप आहेत.
किंग कोब्रा हा बहुतेकदा भारत, दक्षिण चीन आणि दक्षिण पूर्व आशियातील काही भागात आढळतो.