Sakshi Sunil Jadhav
लोक मेहनतीला नेहमीच कंटाळतात. जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही मालामाल होणार असाल तर ते करणं सगळ्यांनाच आवडतं.
रातोरात्र श्रीमंत होण्याच्या आशेने लोक आजही खजिना किंवा चमत्कारिक गोष्टींच्या शोध घेत असतात. बुंदेलखंड भागात टिटवी पक्ष्याला आणि तिच्या अंड्यांना घेऊन अशीच एक जुनी लोककथा प्रचलित आहे.
अनेकांच्या म्हणण्यानुसार टिटवी पक्षी हा हिमालयातून पारस दगड घेऊन येते आणि त्याच दगडाने अंडी फोडते, अशी समज आहे.
कथांनुसार पारस दगड लोखंडाला सोनं बनवतो. आत्तापर्यंत असा दगड अस्तित्वात असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.
टिटवीचा प्रजनन काळ हा मार्च ते जूनदरम्यान असतो. याच काळात ती 2 ते 5 अंडी देते.
टिटवी कधीच झाडांवर अंडी देत नाही. ती नद्या, शेत, मोकळी जमीन अशा सुरक्षित ठिकाणी जमिनीवरच अंडी देते.
टिटवी जितकी अंडी देते, तितके महिने त्या वर्षी पाऊस पडतो, असा अंदाज बांधला जातो.
उन्हाळ्यात बरेच लोक नद्या, शेतात टिटवीची अंडी शोधतात. कारण तिच्या राहत्या जागी अंडी फोडताना पारस दगड मिळेल असं अनेकांना वाटतं.
अंड्यांमधून पिल्लं बाहेर आल्यानंतर तो दगड टिटवी तिथेच सोडून उडून जाते की सोबत घेऊन जाते, याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही, त्यामुळे अधिक संभ्रम आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.