70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

Ulhasnagar corporators Guwahati luxury tour controversy details: उल्हासनगर महापालिकेच्या 76 नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा वादाच्या भोवऱ्यात. 65 लाखांच्या खर्चावर नागरिक संतप्त, अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली कौटुंबिक पर्यटनाचा आरोप.
ULHASNAGAR CORPORATORS ₹65 LAKH GUWAHATI TOUR CONTROVERSY SHOCKS CITIZENS
ULHASNAGAR CORPORATORS ₹65 LAKH GUWAHATI TOUR CONTROVERSY SHOCKS CITIZENSsaam tv
Published On

आखातातील युद्धानं भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण आलायं. उधळपट्टी थांबवा, खर्च आवरा असं खुद्द पंतप्रधानांनी सांगूनही उल्हासनगर महापालिकेनं नगरसेवकांची 65 लाखांची महागडी सहल काढली.आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या या महापालिकेनं जनतेचे लाखो रुपये अभ्यासदौऱ्याच्या नावावर उडवल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. रस्ते पाणी सांडपाणी आणि करसंकलानाची समस्या असतांना सभाशास्त्र, कामकाज, मुद्दे, प्रश्नांची मांडणी, संचिका निर्मिती, प्रभाग विकास आणि नियोजनाच्या प्रशिक्षणासाठी नगरसेवकांची ही सहल 65 लाख रुपये खर्च करुन थेट 3 हजार किलोमीटर दूर गुवाहाटीला काढण्यात आली.

जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

22 ते 26 जुलै दरम्यान उल्हासनगर नगरसेवकांचा अभ्यास दौरा

76 नगरसेवकांसाठी पालिकेच्या 65 लाखांची उधळपट्टी

गुवाहाटीतील पंचतारांकित रेडिसन ब्लूमध्ये शाही मुक्काम

एका नगरसेवकावर तब्बल 74720 रुपयांची खैरात

अभ्यास दौऱ्याच्या आड नगरसेवकांची सहकुटुंब वर्षा पर्यटन

नगरसेवकांना प्रशिक्षण देणं गैर नाही... पण शहराची पार वाट लागलेली असताना आणि पालिकेची तिजोरी रिकामी असताना ही उधळपट्टी कोणासाठी? त्यातही सोशल मीडियावर नगरसेवकांनी टाकलेल्या फोटो आणि व्हिडिओंनी महापालिकेचा हा भांडोफोड केलाय अभ्यासाला गेलेले हे माननीय नगरसेवक एकटे नव्हते, तर सोबत अख्खं कुटुंब घेऊन गुवाहाटीच्या अलिशान हॉटेल्समध्ये मौजमजा करत होते. जनतेच्या करातून जमलेल्या लाखाोंच्या निधीतून हा कौटुंबिक पर्यटनाचा खेळ रंगला.. नगरसेवकांच्या या सहकुटुंब पार्टीचा खर्च नेमका कोणाच्या खिशातून झाला, याचं उत्तर उल्हासनगरच्या जनतेला हवंय..

उल्हासनगर महापालिकेची अवस्था दयनीय आहे. कंत्राटदारांची बिलं, पाण्याची बील देतांना पालिकेची दमछाक होते. राज्यशासनाकडून येणाऱ्या जीएसटीवर कर्मचाऱ्यांचे पगार होतात. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेवर मिळत नाही पण अशा सहलींवर लाखो रुपये सहज खर्च होतात. पालिकेत 6 महिन्यांपुर्वी केवळ 25 ते 30 नवे नगरसेवक आहेत... उरलेले सगळे जुने अनुभवी नगरसेवक. मग या जुन्या दिग्गजांना कसले धडे गिरवायचे होते? की जनतेच्या पैशांवर कुटुंबासह गुवाहाटीच्या झाडी आणि डोंगरांचा आनंद घ्यायचा होता?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com