180 महिला, 350 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ; आरोपी अयान अहमदच्या घरावर बुलडोझर|VIDEO

Amravati Paratwada Viral Video Scandal Latest Updates: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात गंभीर वळण आले असून आरोपी अयान अहमदच्या घरावर प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे समोर आलेल्या व्हिडिओ कांड प्रकरणाने आता दिवसेंदिवस गंभीर वळण घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजेर खान याने मुख्य आरोपी अयान अहमदच्या मोबाईलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीच्या घरावर प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अचलपूर नगरपरिषद आणि परतवाडा नगरपरिषदेच्या वतीने मुख्य आरोपी अयान अहमद याच्या घरावरील अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान शहरातील शेकडो नागरिक, तरुण, महिला आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते आणि संपूर्ण कारवाई पाहण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com