Peacock eating snake: विषारी साप खाऊनही मोर कसा जिवंत राहतो?

Surabhi Jayashree Jagdish

मोर

मोर हा निसर्गातील अतिशय चपळ पक्षी मानला जातो. अनेकदा मोर विषारी सापांवर हल्ला करून त्यांना खातो. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, विषारी साप खाऊनही मोर मरत का नाही?

peacock vs snake

अनेकांच्या मनात प्रश्न

तुम्हालाही कधी हा प्रश्न पडला आहे का की, विषारी साप खाऊ देखील मोर कधीच का मरत नाही. यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया.

why peacocks eat snakes

विष रक्तात जात नाही

सापाचे विष प्रामुख्याने रक्तात किंवा ऊतींमध्ये गेले तरच घातक ठरतं. मोर सापाला खातो तेव्हा विष त्याच्या पोटात जातं, रक्तात नाही. पचनसंस्थेतील एन्झाइम्समुळे ते विष निष्क्रिय होतं.

snake venom effect on peacock

शरीराची प्रतिकारशक्ती

मोरांच्या शरीरात काही प्रमाणात विषाविरुद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती असते. ही प्रतिकारशक्ती सापांसारख्या प्राण्यांशी दीर्घकाळ संपर्कामुळे विकसित झाल्याचं मानलं जातं. त्यामुळे विषाचे परिणाम कमी होतात.

peacock natural predator

शिकार करण्याची पद्धत

मोर सापावर थेट झडप घालत नाही. तो सापाला पळवून थकवतो. त्यानंतर तो चोच आणि नखांनी वार करून सापाला अशक्त करतो. यामुळे सापाला चावण्याची संधी फार कमी मिळते.

venomous snake and peacock

डोक्यावर वार

मोर बहुतेक वेळा सापाच्या डोक्यावर वार करतो. डोके नष्ट झाल्यावर साप विष पसरवू शकत नाही. म्हणून मोर त्याला खाऊ शकतो.

animal behavior peacock

बिनविषारी साप

मोर सर्व प्रकारचे साप खातो असं नाही. तो साधारणपणे लहान किंवा मध्यम आकारांच्या सापांची शिकार करतो. खूप मोठ्या सापांपासून मोर सहसा दूर राहतो.

nature wildlife facts

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Raigad fort history | saam tv
येथे क्लिक करा