Karnataka Crime Saam tv
देश विदेश

Shocking: स्कूटर देण्यास नकार दिल्याने तरुणाची सटकली, बायको अन् सासू-सासऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळलं

Karnataka Crime: कर्नाटकामध्ये एका तरुणाने आपली बायको आणि सासू-सासऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळलं. स्कूटर देण्यास नकार दिल्यामुळे वाद झाला आणि रागाच्या भरात तरुणाने हे भयंकर कृत्य केले.

Priya More

Summary -

  • बंगळुरूमध्ये स्कूटर देण्यास बायकोने नकार दिला

  • नवऱ्याने बायको आणि सासू-सासऱ्यांना जिवंत जाळलं

  • आरोपीने तिघांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं

  • या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली. स्कूटर घेऊन देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका तरुणाने बायको आणि सासू-सासऱ्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपीने या तिघांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. या घटनेत तिघेही गंभीररितया जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंगा (३२ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. तो बंगळुरूच्या नंदिनी लेआऊट परिसरात राहतो. पांडुरंगाची बायको सुमलता ही २७ वर्षांची असून ती घरकाम करते. पांडुरंग सुमलताच्या माहेरी आला होता आणि त्याने सासरच्यांकडे स्कूटर मागितली. सुमलताने स्कूटर घेण्यास नकार दिला त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. नवरा बायकोचा वाद मिटवण्यासाठी सुमलताच्या आई-वडिलांनी हस्तक्षेप केला आणि हा वाद आणखी वाढला.

रागाच्या भरात आरोपीने सुमलता आणि तिच्या आई-वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. तिघांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्ने केला पण तोपर्यंत तिघेही गंभीररित्या भाजले गेले. तिघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांवर उपचार सुरू आहेत पण त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अवघ्या काही तासांत अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT