Petrol-Disel Rate Hike: LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार, तेल कंपनीच्या 'त्या' निर्णयानं खळबळ

Petrol-Disel Price Hike Due to Iran Israel War: एलपीजी गॅसनंतर आता पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तेल कंपन्यांनी एक निर्णय घेतला आहे. आधी पैसे भरा मग पेट्रोल मिळणार, असे मेसेज डीलरला पाठवले आहेत.
Petrol-Disel Price Hike
Petrol-Disel Price HikeSaam Tv
Published On
Summary

एलपीजीनंतर पेट्रोल डिझेल महागणार

तेल कंपन्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम

देशात एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती गॅसच्या किंमती ६० रुपयांनी तर व्यावसायिक गॅसच्या किंमत ११५ रुपयांनी महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. त्यानंतर आता पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम थेट गॅसच्या किंमतीवर होताना दिसत आहे.

Petrol-Disel Price Hike
LPG Price Hike: टेन्शन वाढवणारी बातमी! एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

युद्धाचा परिणाम आता पेट्रोल डिझेलवर ?

इराण-इस्त्रायलचे युद्ध सुरु आहे. त्यामुळे सागरी मार्गाने होणाऱ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.त्यामुळे इंधन,गॅसची आयात होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे.

अशातच आता तेल कंपन्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ॲडव्हान्स पैसे भरा नंतरच पेट्रोल मिळेल, असं तेल कंपन्यांनी सांगितले आहे.

Petrol-Disel Price Hike
Petrol Diesel Price : युद्ध भडकलंय तरी पेट्रोल,डिझेल भडकणार नाही? कसे?

तेल कंपन्यांचा निर्णय

पुण्यातील पेट्रोल डिझेल डीलरला तेल कंपनीचे मेसेज आले आहेत. कालपासून पुण्यातील अनेक डीलरला पेट्रोल कंपन्यांचे मेसेज आले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवू शकतो. युद्ध पेटल्यामुळे येणाऱ्या तेलावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोज पेट्रोल डिझेल हवं असेल तर ॲडव्हान्स पैसे भरा असं डीलर ला त्या त्या कंपनीने मेसेज करून सांगितले आहे.

अगोदर आठ-आठ दिवसाचं क्रेडिट पेट्रोल डीलरला मिळत होते मात्र आत्ता असं मिळणार नाही असं कंपन्यांकडून सांगण्यात आला आहे. हा सगळा युद्धाचा परिणाम आहे असं सांगण्यात येतंय त्यामुळे युद्धाचा परिणाम आता पेट्रोल डिझेलवरही होणार असल्याचे दिसत आहे.

Petrol-Disel Price Hike
LPG Price Hike: पुन्हा दरवाढीचा ब्लास्ट होणार? आज अचानक ६० रूपयांनी सिलिंडर महागला, वाचा तुमच्या शहरातील दर

वाहनांमधील एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या

नागपूरमधील 'गो गॅस' पंपावर LPG चा पुरवठा मर्यादित होत असल्याने सलग दुसऱ्या दिवशी वाहनात लागणाऱ्या LPG किंमतीत वाढ झाली आहे. LPG च्या किमतीत दुसऱ्या दिवशी 5 रुपयांची वाढ झाली आहे. अमेरिका इराण युद्धाचा फटका LPG आयातीला बसत आहे त्यामुळे दरवाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. काल 64.98 पैसे प्रति किलो दर होता, आज त्यात 5 रुपयांची वाढ होऊन 69.93 रुपये झाला आहे. ऑटो LPG च्या किमतीत दोन दिवसांत 13 रुपयांची वाढ झाले आहे.

Petrol-Disel Price Hike
LPG Price Hike: अर्थसंकल्पापूर्वी सर्वसामान्यांच्या खिशाला फटका! LPG गॅसच्या किंमती वाढल्या; वाचा नवीन दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com