Political News: राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयंकर कृत्य, महापालिका आवारात महिला कर्मचाऱ्याचा हात पकडला अन्...

Pune NCP News: पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने एका महिला कर्मचाऱ्यासोबत भयंकर कृत्य केले. महापालिका आवारातच तिचा हात पकडून गैरवर्तन केले.
Political News: राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयंकर कृत्य, महापालिका आवारात महिला कर्मचाऱ्याचा हात पकडला अन्...
Pune NCP News Saam Tv
Published On: 

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने महिला कर्मचाऱ्यासोबत भयंकर कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पुणे महापालिकेत नगरसचिव विभागात काम करणाऱ्या महिलेसोबत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौरांनी गैरवर्तन केले. याप्रकरणी महिला कर्मचाऱ्याने महापालिकेच्या विशाखा समितीकडे तक्रार दाखल केली. या घटनेनंतर प्रशासनाने माजी उपमहापौरांना महापालिकेच्या आवारात प्रवेशबंदी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगर पालिकेत गुरुवारी दुपारी स्थायी समितीची महत्वाची बैठक होती. त्यामुळे नगरसचिव विभागातील बहुतांश कर्मचारी, अधिकारी हे बैठकीच्या ठिकाणी आले होते. दुपारी जेवणाची सुट्टी झाल्याने उर्वरित कर्मचारी हे बाहेर गेले होते. त्यावेळी तक्रारदार महिला देखील बाहेर गेली होती. यावेळी तिच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्याने गैरवर्तन केले.

Political News: राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयंकर कृत्य, महापालिका आवारात महिला कर्मचाऱ्याचा हात पकडला अन्...
Pune : पुणे पोलीस दलात खळबळ! आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित

तक्रारदार महिला कर्मचारी नगरसचिव विभागात काम करते. ही महिला कर्मचारी बैठकीनंतर बाहेर गेली असता माजी उपमहापौर पद भूषविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने थेट महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून गैरवर्तन केले. तसंच असभ्य भाषेत तिच्याशी संवाद साधला. यामुळे महिला कर्मचारी घाबरली.

Political News: राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयंकर कृत्य, महापालिका आवारात महिला कर्मचाऱ्याचा हात पकडला अन्...
Pune School: पुण्यातील १० शाळांची मान्यता रद्द, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; विद्यार्थी अन् पालक चिंतेत

या महिला कर्मचाऱ्याने माजी उपमहापौरांच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घेत घडलेला प्रसंग वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यानंतर या प्रकरणी विशाखा समितीकडे तक्रार दाखल करण्यात आले. या तक्रारीनंतर उपमहापौराला पालिका आवारात बंदी घालण्यात आली. दरम्यान, या प्रकारामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून अशा व्यक्तींना धडा शिकवला जावा, अशी मागणी केली आहे.

Political News: राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयंकर कृत्य, महापालिका आवारात महिला कर्मचाऱ्याचा हात पकडला अन्...
Pune News: सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडाल तर खबरदार, पुणे महानगरपालिकेकडून नियमावली जारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.