Pune : पुणे पोलीस दलात खळबळ! आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित

Pune Police News : पुण्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी अमोल भिसे याला निलंबित करण्यात आले आहे.
Pune Police Amol Bhise Suspended News
Pune Police Amol Bhise Suspended News AI image
Published On: 
Summary
  • पुण्यात पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस कर्मचारी अमोल भिसे याने गोंधळ घातल्याचा आरोप.

  • या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमोल भिसे याला निलंबित केले.

  • बदलीनंतर पुन्हा जुन्याच पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळावी, अशी भिसे याची मागणी होती.

पुण्यातील पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालणाऱ्या पोलीस कर्मचारी अमोल भिसे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली. बदलीनंतर पुन्हा जुन्याच पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी भिसे याने हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी अमोल भिसे हा चारचाकी गाडीतून पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचला. त्यावेळी त्याने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच आयुक्तांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर गाडी धडकवून आत जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Pune Police Amol Bhise Suspended News
Rain Update : महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस! १३ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; वाचा A to Z अपडेट्स

दरम्यान, मंगळवारी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. अमोल भिसे यालाही दुसऱ्या पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली होती. मात्र, आपल्याला पुन्हा पूर्वीचेच पोलीस ठाणे मिळावे, अशी त्याची इच्छा होती. याच मागणीसाठी तो पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेला होता. मात्र, अपेक्षित नियुक्ती न मिळाल्याने त्याने संताप व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

Pune Police Amol Bhise Suspended News
Gokul : गोकुळचे महायुतीचे संचालक सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना!

या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भिसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथेही त्याने गोंधळ घातल्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमोल भिसे हा मानसिक तणावातून वागत असल्याचे सांगितले. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, या संपूर्ण प्रकारामागे बदलीचा विषय असल्याचेही त्यांनी मान्य केले. पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेरच एका पोलीस कर्मचाऱ्याने अशा प्रकारे गोंधळ घातल्याने पोलीस दलात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.