

झारखंडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
तरुणांच्या ग्रुपने पीडितेचे अपरहण केले.
आरोपींनी पीडितेला ३ दिवस ठांबून ठेवत केलं भयंकर कृत्य
झारखंडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. झारखंडच्या पाकुड येथे ही घटना घडली. रस्त्यावरून जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. या मुलीला ३ दिवस डांबून ठेवत ६ जणांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी सहाही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. यामधील ३ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर तिघांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे झारखंड हादरले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ फेब्रुवारीला घडली. पण पीडितेने या प्रकरणी ६ मार्चला पोलिसांना लेखी तक्रार दिली. पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती घरातून दुकानामध्ये जाण्यासाठी निघाली होती. वाटेत काही तरुणांच्या ग्रुपने तिला जबरदस्ती डंपरमध्ये बसवलं आणि सोबत नेलं. आरोपींनी तिला ३ दिवस डांबून ठेवत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. सलग ३ दिवस आरोपींनी पीडितेच्या शरीराचे लचके तोडले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल केला.
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथकं तयार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत दशरथ किस्कू, सकल टूडू आणि प्रधान मरांडी या ३ आरोपींना अटक केली. तर उर्वरीत ३ आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी डंपर जप्त केला. अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.