Crime: डोक्यावर वार करत अल्पवयीन मुलाची हत्या, आरोपी रक्त प्यायला नंतर मेंदूही खाल्ला; हत्याकांडाचा थरकाप उडवणारा VIDEO

Madhya Pradesh Crime: बहिणीच्या घरी आलेल्या अल्पवयीन मुलाची गावातील एका व्यक्तीने हत्या केली. या मुलाची हत्या करून आरोपी त्याचे रक्त प्यायला त्यानंतर त्याचा मेंदू देखील खाल्ला. या घटनेचा थरकाप उडवारा व्हिडीओ समोर आला आहे.
Crime:  डोक्यावर वार करत अल्पवयीन मुलाची हत्या, आरोपी रक्त प्यायला नंतर मेंदूही खाल्ला; हत्याकांडाचा थरकाप उडवणारा VIDEO
Madhya Pradesh CrimeSaam tv
Published On

Summary -

  • मध्य प्रदेशमध्ये १६ वर्षीय मुलाची हत्या

  • आरोपीने रॉड आणि हातोड्याने हल्ला करत मुलाला संपवलं

  • घटनेनंतर गावकऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला

मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यात एक मन सुन्न करणारी घटना घडली. या ठिकाणी डोक्यावर हातोड्याने वार करत एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने या मुलाचे रक्त प्यायला आणि त्याचा डोक्यातून मेंदू काढून खाल्ला. हत्या झालेल्या १६ वर्षीय मुलाचे नाव भरत विश्वकर्मा होते. तो बहिणीच्या घरी आला होता. त्यावेळी गावातील एका व्यक्तीने त्याची निर्घृण हत्या केली. गावातील सर्वांच्या डोळ्यासमोर ही हत्याकांडाची घटना घडली. त्यानंतर गावकऱ्यांनी आरोपीला मारहाण करत पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

हत्या झालेल्या मुलाच्या भावाने सांगितले की, भरत आणि तो बहिणीच्या घरी जात होते. तेव्हा गुड्डा पाटेल नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. त्याने आधी भरतवर रॉडने वार केले. त्यानंतर हातोड्याने १५ ते २० वेळा त्याच्यावर हल्ला केला. हे इतक्या वेगाने झाले की भरतला जीव वाचवण्याची आणि पळण्याची संधी मिळाली नाही. या हल्ल्यात भरतचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तो भरतचे रक्त प्यायला. त्याच्या डोक्यातून मेंदू काढून त्याने तो खाल्ला.

भरतची हत्या केल्यानंतर आरोपी शेतामध्ये पळून गेला. या हत्याकांडाने गावात खळबळ उडाली. गावातील नागरिकांनी आरोपीला घेरलं आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. आरोपीने यावेळी गावकऱ्यांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपीविरोधात पोलिांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपी गुड्डा पटेल गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तो आधीच हत्याप्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगून आला आहे. त्याची मानसिक स्थिती तपासली जात आहे. आरोपीची पोलिस चौकशी करत आहेत.

Crime:  डोक्यावर वार करत अल्पवयीन मुलाची हत्या, आरोपी रक्त प्यायला नंतर मेंदूही खाल्ला; हत्याकांडाचा थरकाप उडवणारा VIDEO
Crime: ९० वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार, तोंडात कापड टाकलं अन्...; विहिरीत फेकण्याचा प्रयत्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com