Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव डंपर घरावर कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू

Pune Mulshi Accident News : पुण्यातील मुळशी तालुक्यात रिंग रोडच्या कामादरम्यान डंपर घरावर पलटल्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे भरपाईची मागणी केली आहे.
Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! डंपर अचानक घरावर कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू
Pune Mulshi Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • मुळशी रिंग रोडच्या कामादरम्यान डंपर घरावर पलटला

  • दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू

  • सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा संशय

  • पोलिस आणि प्रशासनाकडून तपास सुरू

  • नागरिकांकडून भरपाईची मागणी

पुण्यातील मुळशीत रिंग रोड कामादरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे. डंपर घरावर पलटल्याने घरातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तसेच नागरिकांनी प्रशासनाकडे भरपाईची मागणी केली आहे.

मिळालेली माहितीनुसार, मुळशी तालुक्यात रिंग रोडचे रस्त्याच्या भरावाचे काम सुरू होते. यादरम्यान डंपर चालकाचा ताबा सुटल्याने डंपर थेट एका घरावर पलटला. या भीषण अपघातात घरात असलेल्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! डंपर अचानक घरावर कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू
Akola : एका लग्नाची अजब गोष्ट! सोशल मीडियावर जुळल्या रेशीमगाठी, साडेतीन फूट नवरदेव आणि तीन फूट नवरीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिस,अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले.

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! डंपर अचानक घरावर कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू
Maharashtra Politics : महापौर निवडणुकीआधी भिवंडीत मोठी घडामोड, भाजपच्या नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून फोडण्याचे प्रयत्न

प्राथमिक माहितीनुसार, रिंग रोडचे काम सुरू असताना सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि जड वाहनांची बेफिकीर वाहतूक हे या अपघातामागचे कारण असू शकते. मात्र, याबाबत अधिकृत चौकशी सुरू आहे. तसेच प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाइकांना मदत आणि नुकसानभरपाईबाबत मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com