सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांना शह? 'गोकुळ'नंतर जिल्हा बँकेतही भाजपची तिरकी चालl; माजी खासदाराला गळाला लावण्याचे प्रयत्न

Sanjaykaka Patil Emerges As Kingmaker In Sangli District Bank Election: गोकुळनंतर आता सांगली जिल्हा बँकेत संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीनं रणनीती आखलीये. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना धक्का बसण्याची शक्यता आहे. सांगली बँकेवरील सत्तेसाठी महायुतीनं काय रणनीती आखलीये?... सत्ता समीकरण नेमकं काय आहे?.... पाहूयात या रिपोर्टमधून...
Sangli District Bank chairman election latest news
Sangli District Bank chairman election latest newssaam tv
Published On: 

राज्यात गोकुळ दूध संघावरील वर्चस्वाच्या लढाईत महायुतीच्या रणनीतीची चर्चा रंगलीये. अशातच आता सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीनं मोर्चेबांधणी सुरू केलीये. एव्हंढच नव्हे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांना शह देण्यासाठी भाजपनं रणनीती आखल्याची सूत्रांची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे, सांगली जिल्हा बँकेत महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे बँकेवर महायुतीचा अध्यक्ष बसवण्यासाठी भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय.

सांगली जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी 10 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेसनं 06 जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 04 जागा जिंकल्यात. तर महायुतीत भाजपला 05, शिंदेसेना 03 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 02 जागा जिंकल्यात. तासगाव विकास सेवा सोसायटीतून निवडून आलेले माजी खासदार संजयकाका पाटील हे तांत्रिकदृष्ट्या अपक्ष संचालक असल्याचं समोर आलंय...

गोकुळवरील अध्यक्षपदाच्या निवडीचा तिढा 1 जागेमुळे रखडल्यानं सत्ताधारी आणि काँग्रेस आमदार सतेज पाटलांमध्ये संघर्ष पेटलाय. अशातच आता सांगली जिल्हा बँकेतही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळतेय. स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी रस्सीखेच सुरू झालीये. त्यामुळेच अपक्ष संचालक असलेले संजयकाका पाटील हे आता किंगमेकरच्या भूमिकेत आलेत. संजयकाका पाटलांच्या भूमिकेवरच जिल्हा बँकेवर सत्ता कुणाची येणार, हे ठरणार आहे. म्हणूनच की काय आता भाजपकडून पाटलांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं दिसतंय. मात्र, संजयकाका पाटील नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.