बोगस क्रीडा प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, हा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या वैभव चव्हाणचा बीडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलाय. महत्त्वाचं म्हणजे, माझ्या आणि माझ्या मित्राच्या जीवितास धोका असल्याच्या वैभवच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्स व्हायरल झाल्या आहेत. वैभव चव्हाणच्या मृत्यूपुर्वीची कथित ऑडिओ क्लिप साम टिव्हीच्या हाती लागलीये...
तर दुसरीकडे, वैभवच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी घातपाताचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केलीये... बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून वैभवच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिलीये... दरम्यान, राज्याच्या क्रीडा क्षेत्रात खळबळ उडवून देणारा बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा कसा उघडकीस आला होता ते पाहूयात...
वैभवच्या मृत्यूनं बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्याची राज्यभरात पुन्हा एकदा चर्चा रंगलीये. वैभवच्या मृत्यूमागे कुराश संघटनेचा हात असल्याचा आरोप करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी चव्हाण कुटुंबियांनी केलीय. त्यामुळे हा घोटाळा बाहेर काढणाऱ्या वैभवची हत्या आहे की आत्महत्या याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.