2 Month Baby Dies from Heart Attack Saam
देश विदेश

DJ च्या दणदणाटामुळे चिमुकली रडत राहिली, २ महिन्यांच्या मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, गावात हळहळ

2-Month-Old Baby Dies: डीजेच्या आवाजामुळे बाळ खूप अस्वस्थ झालं. ह्रदयविकाराच्या झटक्यानं चिमुकलीचा मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

  • डीजेच्या आवाजामुळे २ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू.

  • पालकांच्या विनंतीनंतरही आवाज कमी करण्यात आला नाही.

  • बाळाचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू.

डीजेच्या आवाजामुळे २ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्देवी मृ्त्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना रांची येथील चान्होस्थित पाटूक बाजोटीलीमधून उघडकीस आली आहे. या घटनेनंतर चिमुकलीचे वडील बंधन लोहारा यांनी चोन्हो पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

बंधन लोहारा यांनी दाखल केलेल्या तक्ररीनुसार, बुधवार, १७ सप्टेंबर रोजी पुजेनिमित्त त्यांच्या घराजवळ मोठ्या आवाजात डीजे लावला होता. यामुळे परिसरातील वडिलधारी आणि लहान मुलांना प्रचंड त्रास झाला होता. डीजेच्या आवाजामुळे सोनाक्षी देखील प्रचंड रडत होती.

त्यांनी गुरूवारी आयोजकांना भेटून डीजेचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. परंतु, डीजे वादकांनी त्यांचे ऐकले नाही. मोठ्या आवाजाच्या डीजेमुळे मुलगी खूप अस्वस्थ झाल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. सांगून देखील डीजे वादकांनी डीजेचा आवाज बंद किंवा कमी केला नाही.

शुक्रवारी सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी चिमुकलीचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यानं झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही कायद्याची भीती न बाळगता डीजेचा वापर सुरूच आहे, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

धार्मिक आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात वाजणाऱ्या डीजे संगीत आणि साउंड सिस्टमविरूद्ध जिल्हा प्रशासन वारंवार आवाहन करते. रात्री १० नंतर साउंड सिस्टम वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही सातत्यानं याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे परिसरातील लोकांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवरात्रौत्सव काळात कल्याणकारांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा

Laxman Hake : ओबीसी आंदोलनात फूट? भुजबळांच्या मेळाव्यातून लक्ष्मण हाकेंना वगळलं? VIDEO

GK: जगातील पहिल्या रेल्वे प्रवासाची सुरुवात कोणत्या देशात झाली? जाणून घ्या

Kolhapur Crime News : दूध आणायला गेलेल्या बहिण भावाचं अपहरण, रणरागिणीने अपहरणकर्त्यांचा डाव उधळला

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला, जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT