कृषीमंत्र्यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला; काळे झेंडे दाखवत निषेध, नेमकं कारण काय?

Minister Bharne Faces Shiv Sena Protest: राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Minister Bharne Faces Shiv Sena Protest
Minister Bharne Faces Shiv Sena ProtestSaam
Published On
Summary
  • हिंगोलीत पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान.

  • शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कृषिमंत्र्यांचा ताफा अडवला.

  • शिवसैनिकांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न.

हिंगोलीत मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. अशातच आज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दौऱ्यावर आहेत. वाशिम जिल्हा दौरा करून नांदेडच्या दिशेनं जात असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भरणेंचा ताफा अडवत काळे झेंडे दाखवले. तसेच निषेध व्यक्त केला.

हिंगोलीत पावसामुळे पिके वाहून गेली आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जामुळे चिंतेत आहेत. मात्र अद्याप कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हिंगोलीतील दुष्काळ भागात भेट दिली नाही. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. नांदेडच्या दिशेनं जात असताना शिवसैनिकांनी रस्त्यावर भरणेंचा ताफा अडवला. तसेच काळे झेंडे दाखवले.

Minister Bharne Faces Shiv Sena Protest
मराठवाड्यात पावसाचं रौद्ररूप; १ हजार ४१८ कोटी रूपयांचं नुकसान, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाला. शिवसैनिक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांनी रस्त्यावर भरणेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

Minister Bharne Faces Shiv Sena Protest
'तुझे कपडेच काय, तुझीxxx.. सुद्धा ठेवणार नाही'; वाटेगावकरांकडून गोपीचंद पडळकरांना सज्जड दम

हिंगोलीत शेतकऱ्यांना पावसाचा फटका

मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. या पावसाचा फटका हिंगोली जिल्ह्यालाही बसला असून, प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील रीप आणि बागायती मिळून सुमारे पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याची माहिती हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळांना जिल्हा प्रशासनाने दिली. या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com