भर दुपारी घरात घुसला, १७ वर्षीय तरूणीवर सपासप चाकूनं वार; CCTV मुळे आरोपीचं पितळ उघड

Minor Girl Stabbed to Death: नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या. आरोपी नात्यातीलच. घरात घुसून चाकूनं संपवलं. आर्थिक वादातून खून झाल्याचं उघड.
Minor Girl Stabbed to Death
Minor Girl Stabbed to DeathSaam Tv
Published On
Summary
  • नवी मुंबईत मुलीची हत्या.

  • आरोपी नात्यातीलच असल्याची माहिती.

  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी अटकेत

नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. घरात घुसून एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही हत्या नात्यातल्याच एका व्यक्तीनं केल्याची माहिती आहे. ही घटना तळोजा फेस - २ मध्ये घडली असून, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मोहम्मद आयुब साहिल (वय वर्ष ४४) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नात्यातीलच मुलीच्या भर दुपारी (वय वर्ष १७) घरात घुसला. नंतर तिच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत तरूणी जमिनीवर कोसळली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

Minor Girl Stabbed to Death
कृषीमंत्र्यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला; काळे झेंडे दाखवत निषेध, नेमकं कारण काय?

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासासाठी घटनास्थळ गाठलं. तसेच तीन पथके तयार करून तांत्रिक आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद झाला. त्याच्या चालण्यावरून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मोहम्मदला शोधलं.

Minor Girl Stabbed to Death
मध्यरात्री ठो-ठो, गोळीबाराचा आवाज ऐकून नागरीक घाबरले, बिल्डरच्या ऑफिसवर ३० गोळ्या झाडल्या अन्...

पोलिसांनी मोहम्मदला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्यानेच या १७ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचं निष्पन्न झालं. अधिक तपासात घटनेतील आरोपी मृत मुलीच्या नात्यातील असून, त्यांच्यात आणि आरोपीचे आर्थिक देवाणघेवाण आणि इतर कारणावरून वाद असल्याचे निष्पन्न झाले. त्यातूनच त्याने या मुलीची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

Minor Girl Stabbed to Death
हॉस्पिटलसमोर गाडी थांबवली, माझ्याकडे पाहून हस्तमैथून, व्यक्तीनं व्हिडिओ शूट केला अन्..., नक्की काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com