Rajkot crime Saam TV Marathi
देश विदेश

संतापजनक! पोटच्या लेकीवर अन् पुतणीवर नराधमाचा बलात्कार; पॉर्न दाखवायचा, टीव्हीचा आवाज वाढवायचा अन्...

Rajkot Crime News : बंद दाराआड माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडत होता. जो बाप मुलींचा रक्षक असायला हवा, तोच भक्षक बनल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

Rajkot crime Update : राजकोटमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम बापाने पोटच्या मुलीसह पुतणीवर गेल्या अनेक वर्षांपासून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. टीव्हीचा आवाज मोठा करून नराधम चार भींतीमध्ये मुलींचा आवाज दाबत होता. वासनांध बापाने मुलींना पॉर्न चित्रपट दाखवून त्यांच्यावर पाशवी अत्याचार केले.

धक्कादायक म्हणजे मुलींच्या ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून नराधम घरातील टीव्हीचा आवाज मोठा करायचा. मुलीला पॉर्न दाखवयाचा अन् अब्रू लुटायचा. पीडित मुलींनी पाच ते सात वर्षानंतर आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल माहिती दिली. या प्रकरणी राजकोट पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हे प्रकरण समोर येताच राजकोट अन् परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, राजकोटमध्ये नराधम बाप मागील काही वर्षांपासून मुलगी अन् पुतणीवर बलात्कार करत होता. आरोपी बाप मुलींना आमिष दाखवून आणि धाक दाखवत बलात्कार करत होता. मुलीचा रक्षक असणाऱ्या बापानेच क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर सर्वजण सुन्न झाले. या घटनेने पोलिसांनाही विचार करायला भाग पाडले आहे. या प्रकरणातील धक्कादायक खुलासे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल.

 पीडित मुलींनी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत नातेवाईकांना आपबिती सांगितल्यानंतर संतापजनक प्रकार समोर आला. मुलींनी सांगितले की, जेव्हा बाप अत्याचार करायचा, तेव्हा घराचा दरवाजा बंद करून टीव्हीचा आवाज मोठा करायचा. त्यामुळे त्यांचा किंचाळण्याचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हता. मुलींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. राजकोट पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT