Raja Raghuvanshi Case x
देश विदेश

सोनमचं भयंकर रूप उघड; लग्नाआधी तीनदा, लग्नानंतर चौथ्यांदा आखला होता राजाच्या हत्येचा कट, आताही वाचला असता तर...

Raja Raghuvanshi Case Update : राजा रघुवंशीला मारण्याचे सोनम आणि राज यांनी अनेक प्रयत्न केले होते. जर मेघालयमध्ये राजा वाचला असता, तर त्याला मारण्यासाठी त्यांनी पाचवा प्लान सुद्धा तयार ठेवला होता अशी माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

Raja Raghuvanshi प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. सोनम आणि राज यांनी राजाला एकूण ४ वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली आहे. अनेक यशस्वी प्रयत्नानंतर सोनमने राजाला मारण्यासाठी २३ मे २०२५ हा दिवस निवडला. इतकंच नाही, तर राजाचा काटा काढण्यासाठी सोनमने पाचवा प्लान देखील आखला होता.

सोमन आणि तिच्या साथीदारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये राजा रघुवंशीचा जीव घ्यायचा होता. लग्नापूर्वी त्यांनी तीनदा राजाला मारण्याचा प्रयत्न केला होता. मेघालयात हनिमूनच्या बहाण्याने त्यांनी राजाच्या हत्येचा चौथांदा प्रयत्न केला. या प्रयत्नात ते यशस्वी झाले. जर राजा यावेळेही वाचला असता, तर सोनम आणि राज यांनी राजाला मारण्यासाठी पाचवी योजना आखल्याची माहिती समोर आली आहे.

सोनमने तिच्या प्रियकरासह, राजसह राजा रघुवंशीला मारण्याचा आणखी एक कट रचला होता. जर सोहरामध्ये राजा मारला गेला नसता, तर सोनम त्याला शिलाँगमपासून ८० किमी अंतरावर असलेल्या डावकी येथे घेऊन जाणार होती. हा परिसर बांगलादेशच्या सीमेजवळ आहे. तेथे उमंगट नदी वाहते. पिकनिकच्या बहाण्याने ते डावकी येथे घेऊन जाणार होते. तेथे राजाची हत्या करुन त्याचा मृतदेह नदीत फेकून देण्याचा सोनम आणि राज यांचा प्लान होता.

विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीने सोनमसह अन्य आरोपींची चौकशी केली. त्यावेळेस त्यांचा हा प्लान उघड झाला. पाचही आरोपी कोणती नवीन कहाणी रचू नये यासाठी मेघालय पोलिसांनी सर्व आरोपींना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या लॉकअपमध्ये बंद केले आहे. सोनमला पोलिसांनी पूर्व खली हिल्सच्या पोलीस ठाण्यातील महिला कक्षात ठेवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT