
Ahmedabad Air India Plane Crash : १२ जून रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर (एआय १७१) विमानाने उड्डाण केले. ७०० फूट वर गेल्यानंतर अवघ्या काही सेकंदात विमान खाली कोसळले. मेघानीनगरमधील मेडिकल कॉलेजच्या कॉम्प्लेक्सवर विमान कोसळून मोठा स्फोट झाला. एअर इंडियाच्या विमानात पायलट, क्रू मेंबर्स, प्रवासी असे २४२ जण होते. यातील फक्त एकजण दुर्घटनेमध्ये वाचला.
मेघानीनगरमध्ये विमान कोसळल्यानंतर ५६ वर्षीय व्यावसायिक राजू पटेल घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. स्फोटामुळे आसपासच्या इमारतींच्या भिंती कोसळल्या होत्या. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असतील, त्यांना मदतीची गरज असेल असा विचार करत राजू पटेल त्याच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी मदतीसाठी पोहोचले होते. ढिगाऱ्यातून त्यांना ७० तोळे सोने (सोन्याचे दागिने), ८० हजार रुपये (रोख नोटा), प्रवाशांचे पासपोर्ट आणि भगवद्गीता सापडल्याचे राजू पटेल यांनी सांगितले.
'सुरुवातीला १५-२० मिनिटांपर्यत आम्हाला मदतीला जाता आले नाही. आग भीषण होती, आम्ही लांब होतो. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका आल्यानंतर आम्ही मदतीसाठी धावलो. स्ट्रेचर उपलब्ध होत नसल्याने जखमींसाठी साड्या, चादरी वापरल्या. शक्य तितकी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केला', अशी माहिती राजू पटेल यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी राजू पटेल आणि त्यांच्या टीमला रात्री नऊपर्यंत घटनास्थळी राहण्याची आणि मदत करण्याची परवानगी दिली होती. त्यांनी अवशेष शोधण्याचे काम देखील केली. ढिगाऱ्यातून राजू यांच्या टीमने ७० तोळे सोन्याचे दागिने (८०० ग्रॅमपेक्षा जास्त), ८०,००० रोख रुपये, पासपोर्ट आणि एक भगवद्गीता बाहेर काढली. हे सामान पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले. ढिगाऱ्यातून काढण्यात आलेल्या वस्तू ज्यांच्या आहेत, त्यांच्या नातेवाईकांकडे दिल्या जाणार आहेत, असे वक्तव्य गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.