
Air India चे प्रवासी बोईंग विमान अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानीनगर येथे कोसळले. १२ जून रोजी ही विमान दुर्घटना घडली. विमानात पायलट, क्रू मेंबर्स, प्रवासी मिळून २४२ जण होते. यातील २४१ जणांचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर काल एअर इंडिया एक्स्प्रेसच्या जयपूरहून दुबईला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले. बिघाडामुळे हे विमान पाच तास विमानतळावर होते.
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानामधील प्रवासी तब्बल पाच तास विमानात बसून होते. विमानातील एका महिला प्रवासीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत एअर इंडिया एक्स्प्रेसवर गंभीर आरोप केले. 'एअर कंडिशनिंग, क्रू सपोर्टशिवाय विमानात थांबवून ठेवले होते. नक्की काय घडत आहे याची माहितीही आम्हाला दिली नव्हती, असे व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरजू सेठी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सेठी त्याच्या तीन वर्षांच्या मुलासह विमानाने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. हा व्हिडीओ १.८ कोटींपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. यामुळे एअर इंडिया एक्स्प्रेसवर टीका केली जात आहे.
फ्लाइटमध्ये एसी बंद झाल्याने प्रवाशांना पाच तास गरम वातावरणात राहावे लागले. उष्णतेमुळे प्रवासी घामाने भिजले. लहान मुले रडू लागली. बरेचसे प्रवासी मदतीसाठी हाका मारत होते. पण एकाही क्रू मेंबरने प्रतिसाद दिला नाही, असे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. जर तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे टेकऑफ थांबवण्यात आले, तर त्याची माहिती आम्हाला का दिली नाही असा प्रश्न विमानातील प्रवाशांनी उपस्थित केली आहे. या प्रकरणात एअर इंडिया एक्स्प्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. सेठी यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.