Pune Bridge Incident : पुण्यात जोरदार पाऊस, कुंडमळानंतर आणखी एक पूल वाहून गेला; परिसरात मोठी खळबळ

Pune News : पुणे कोलाड मार्गावरील पिरंगुट येथे नवीन पुलाचे बांधकाम सुरु होते. यामुळे तेथे वाहतुकीसाठी तात्पुरता पूल बांधण्यात आला होता. हा पूल पावसाच्या संततधारेमुळे वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Bridge Incident
Pune Bridge Incident Saam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्याच्या मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. पूल कोसळल्यानंतर अनेकजण इंद्रायणी नदीच्या पात्रात वाहून गेले. यातील ५१ जणांना वाचवण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला, तर तीन ते चार जण बेपत्ता असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी कालपासून एनडीएआरएफ आणि अन्य पथकांकडून बचावकार्य सुरु आहे. कुंडमळ्यातील लोखंडी पूल कोसळल्याची घटना ताजी असताना आणखी एक पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे कोलाड मार्गावरील पिरंगुट येथे नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे हा पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. नव्या पुलाच्या उद्घाटनापूर्वी या तात्पुरत्या पुलाचा वापर केला जात होता. हाच पूल आता वाहून गेल्याचे समोर आले आहे.

Pune Bridge Incident
Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर! रस्ते जलमय, शेवटी जेसीबीनेच काढावे लागले साचलेले पाणी; नागरिकांचा संताप

पिंरगुट येथील तात्पुरता पूल वाहून जाण्याची घटना घडण्यापूर्वी नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच पुलाच्या उद्घाटनाचा समारंभ संपन्न झाला होता. त्यामुळे तात्पुरत्या पुलाऐवजी नव्या पुलाचा वापर सुरु करण्यात आला आहे. नवीन पूल सुरु झाल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे म्हटले जात आहे.

Pune Bridge Incident
Ahmedabad Plane Crash : मृतदेहाच्या बॅगेत दोन शीर आढळले, कुटुंबियांनी घातला गोंधळ, म्हणाले- अवशेष नको तर...

भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने दोन दिवसांपूर्वी प्रशासनाच्या मागे लागत नागरिकांना सोबत घेऊन वारंवार पाठपुरावा केला आणि नवीन पूल सुरु करण्यास प्रशासनाला भाग पडाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय टळल्याचे म्हटले जात आहे. हा पूल पुणे-कोलाट या मुख्य मार्गावरील पिंरगुट येथे उभारण्यात आला आहे.

Pune Bridge Incident
Rajeshwari Kharat : मी लहानपणापासूनच ख्रिश्चन, कोणता धर्म बदलला नाही; धर्मांतराच्या चर्चांवर 'फँड्री' फेम शालूची रोखठोक प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com