Ahmedabad Plane Crash : मृतदेहाच्या बॅगेत दोन शीर आढळले, कुटुंबियांनी घातला गोंधळ, म्हणाले- अवशेष नको तर...

Air India Plane Crash : विमान अपघातातील मृतांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येत आहेत. या दरम्यान एका प्रकरणात मृतदेहाच्या एका पिशवीत दोन शीर आढळल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून ओळख पटवण्याची प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.
Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crashx
Published On

Ahmedabad Airplane Crash : १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान नागरी वस्तीवर कोसळले. या प्रवासी विमानामध्ये प्रवासी, क्रू मेंबर्स, पायलट असे २४२ जण होते. यातील २४१ जणांचा अपघातात दुर्देवी अंत झाला. फक्त एकजण सुदैवाने वाचला. विमान ज्या ठिकाणी कोसळले, तेथे आसपास ३३ लोक अपघातामध्ये मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे.

अहमदाबाद विमान अपघातात ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्यापैकी अनेकांचे कुटुंबीय आपल्या प्रियजनांचा मृतदेह मिळावा यासाठी प्रतीक्षा करत आहे. अपघातामध्ये इतका मोठा स्फोट झाला की अनेकांचे तुकडे झाले. त्यामुळे लोकांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले आहे. एका मृताच्या कुटुंबीयांना मृतदेहाची बॉडी बॅगेमध्ये दोन शीर आढळून आले. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

Ahmedabad Plane Crash
Air India Expressच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड, टेकऑफ होण्याआधी उड्डाण रोखलं; प्रवाशांमध्ये मोठी खळबळ

एका बॉडी बॅगेत दोन मृत व्यक्तींचे अवशेष सापडल्याने मृतदेह सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेत अनपेक्षित अडथळे निर्माण झाले आहेत. डीएनए चाचणीसाठी ७२ तास लागतात. दोन शीर एकाच बॉडी बॅगेत सापडल्याने पुन्हा एकदा डीएनए चाचणी करण्यात आली आहे. अशा चुकांमुळे मृताच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेदरम्यान चमत्कार! भगवद्गीतेनंतर आता बाळकृष्णाची मूर्ती, कपडाही...

१२०० खाटांच्या सरकारी रुग्णालयामध्ये मृतदेहांचे डीएनए विश्लेषण सुरु आहे. आपल्या प्रियजनांचा संपूर्ण मृतदेह मिळावा यासाठी अनेकजण या सरकारी रुग्णालयासमोर थांबले आहेत. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहांच्या बॅगा तपासणी खोलीबाहेर ठेवलेल्या आहेत. आम्ही वैद्यकीय नियमांनुसार मृतदेह एकत्र करुन कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतो. त्यांची चाचणी केली जाते आणि मग ओळख पटल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली केले जाते. पण संपूर्ण मृतदेह मिळेल याची खात्री देत येत नाही. स्फोटामुळे अनेकजण पूर्णत: जळाले आहेत.

Ahmedabad Plane Crash
Shivaji Maharaj Statue : आधी पुतळा, आता चबुतऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यात पुन्हा भ्रष्टाचार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com