Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर! रस्ते जलमय, शेवटी जेसीबीनेच काढावे लागले साचलेले पाणी; नागरिकांचा संताप

Pune News : पुण्यात पाऊस जोरदार बॅटिंग करत आहे. पावसामुळे पुणे अहिल्यानगर महामार्गावरील तुळापूर फाटा येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पाणी काढण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर करावा लागला.
Pune Rain
Pune Rainx
Published On

रोहिदास गाडगे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबत मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरात जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाटा येथे पाणीच पाणी झाले.

पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाटा येथे पाणी साचले. पाणी काढण्याची चक्क जेसीबीचा वापर करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नुकतंच पुणे-अहिल्यानगर महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे करण्यात आले होते.

Pune Rain
Air India Expressच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड, टेकऑफ होण्याआधी उड्डाण रोखलं; प्रवाशांमध्ये मोठी खळबळ

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आणि पाणी निचरा करण्याची व्यवस्था नसल्याने पुणे अहिल्यानगर महामार्गावरील तुळापूर फाटा येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. हे पाणी काढण्यासाठी प्रशासनाला जेसीबीचा वापर करावा लागला. या महामार्गाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते. आता कामाच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

Pune Rain
Ahmedabad Plane Crash : मृतदेहाच्या बॅगेत दोन शीर आढळले, कुटुंबियांनी घातला गोंधळ, म्हणाले- अवशेष नको तर...

कोथरूड भागात सोसायटीमध्ये घुसले गटाराचे पाणी...

पुण्यातील कोथरूड भागात असणाऱ्या ३ ते ४ सोसायटींमध्ये गटाराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरातील अनेक गटारे तुंबली आहे. याचा फटका कोथरूडमधील नागरिकांना बसला आहे. सोसायटींच्या पार्किंगसमध्ये कंबरेपर्यंत पाणी गेल्याने नागरिकांना आतमध्ये शिरता येत नसल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय गटाराच्या पाण्यामुळे परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Pune Rain
Shivsena : रश्मी ठाकरेंमुळे शिवसेना फुटली? मातोश्रीच्या नव्या 'माँसाहेब'? शिवसेनेचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हाती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com