Air Indiaच्या आणखी एका विमानात मोठ्ठा बिघाड, दिल्लीहून पॅरिसला जाणारे विमान रद्द; प्रवाशांमध्ये खळबळ

Air India Plane : मंगळवारी (१७ जून) दिल्लीवरुन पॅरिसला निघालेल्या विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यानंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Air India Plane
Air India Planex
Published On

Air India : दिल्लीहून पॅरिसला जाणारे एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण टेकऑफपूर्वी रोखण्यात आले. विमानाच्या अनिवार्य तपासणीदरम्यान विमानात तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले. उड्डाणापूर्वीच्या चाचणीत AI143 या विमानात काही तांत्रिक बिघाड आढळून आला आणि तांत्रिक पथकांकडून यासंबंधित उपाययोजना करण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

'वेळेची कमतरता आणि पॅरिस चार्ल्स डी गॉल (CDG) या पॅरिसमधील विमानतळावर रात्रीच्या वेळेस निर्बंद असल्याने विमान कंपनीने विमानाचे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला. १८ जून रोजी पॅरिसहून दिल्लीला जाणारे परतीचे विमान AI142 देखील रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करत आहोत. त्यांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास किंवा वेळापत्रकात बदल केल्यास त्यांनी पूर्ण परतफेड केली जाईल', असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

Air India Plane
Ahmedabad Plane Crash : ७० तोळे सोनं, ८० हजारांची रोकड, भगवद्गीता आणि... विमान दुर्घटनेच्या घटनास्थळी नेमकं काय सापडलं?

१२ जून रोजी झालेल्या AI 171 विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान नागरी वस्तीवर कोसळले होते आणि मोठी दुर्घटना घडली होती.

Air India Plane
Doomsday Fish : त्सुनामी अन् विध्वंसक भूकंपाचे संकट, समुद्रातून मिळाले संकेत, पाहा व्हिडिओ

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून AI 171 हे विमान उड्डाणासाठी तयार झाले होते. दुपारी दीडच्या सुमारास विमानाने टेकऑफ केले. अवघ्या काही सेकंदांनंतर विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. अपघाताच्या वेळी विमानात २४२ जण होते. यातील फक्त एकमेव प्रवासी दुर्घटनेमध्ये वाचला.

Air India Plane
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com