Doomsday Fish : त्सुनामी अन् विध्वंसक भूकंपाचे संकट, समुद्रातून मिळाले संकेत, पाहा व्हिडिओ

Viral Video : भारताच्या तामिळनाडूमध्ये एक दुर्मिळ मासा सापडला आहे. पण या माशामुळे नैसर्गिक संकट येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत, असे म्हटले जात आहे. या माशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Doomsday Fish
Doomsday Fishx
Published On

Video : महासागरात खोलवर असे अनेक रहस्यमय प्राणी राहतात, अशा अनेक प्राण्यांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. असाच एक प्राणी म्हणजे ओअरफिश. या माश्याला 'डूम्सडे फिश' म्हणून देखील ओळखले जाते. हा मासा खोलवर राहणे पसंत करतो, त्याची झलक खूपच दुर्मिळ आहे. पण जेव्हाही ओअरफिश पृष्ठभागावर येतो तेव्हा संकट येणार असे मानले जाते.

काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्यांनी हा अनोखा मासा पकडला चांदेरी रंगाचे शरीर, लहरी आकार आणि डोक्याजवळ लाल कंगव्यासारखे पंख असा आगळावेगळा मासा पाहून सर्वांना आश्चर्य वाटले होते. हा मासा समुद्रात २०० ते १००० मीटर खोलीवर राहतो, त्याची लांबी ३० फूटांपर्यंत जाऊ शकते. त्याचे समुद्राच्या पृष्ठभागावर येणे फक्त दुर्मिळच नाही, तर धक्कादायक देखील मानले जाते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तामिळनाडूमध्ये 'डूम्सडे फिश' आढळला असे म्हटले आहे.

Doomsday Fish
Air Indiaच्या आणखी एका विमानात मोठ्ठा बिघाड, दिल्लीहून पॅरिसला जाणारे विमान रद्द; प्रवाशांमध्ये खळबळ

ओअरफिशचे दिसणे म्हणजे एखाद्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे आगमन होणे असा वर्षानुवर्ष समज आहे. याबाबत सर्वात प्रसिद्ध घटना २०११ मध्ये घडली होती. जपानमध्ये भयानक भूकंप आणि त्सुनामीपूर्वी समुद्रकिनाऱ्यावर अनेक ओअरफिश मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर या माशांचा जमिनीखाली होणाऱ्या हालचालींशी काही गूढ संबंंध असू शकतो असा समज अधिक दृढ झाला. यामुळेच ओअरफिशला 'डूम्सडे फिश' असे नाव पडले.

Doomsday Fish
Ahmedabad Plane Crash : ७० तोळे सोनं, ८० हजारांची रोकड, भगवद्गीता आणि... विमान दुर्घटनेच्या घटनास्थळी नेमकं काय सापडलं?

ओअरफिशचे पृष्ठभागावर येणे हे समुद्राखाली काही मोठी हालचाल होत असल्याचे संकेत देते. त्यामुळे याला नैसर्गिक इशारा म्हणून पाहिले जाते. फक्त जपानच नाही, तर ओअरफिश दिसल्यानंतर काही काळाने मेक्सिकोमध्येही भूकंप झाला होता. आता हा मासा भारतातील तामिळनाडूमध्ये दिसला आहे. तेव्हा ही घटना नैसर्गिक आपत्तीचे संकेत देत आहे अशी भीती लोकांच्या मनात आहे.

Doomsday Fish
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com