Rahul gandhi  Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi PC Highlights: मतचोरीचे अ‍ॅडिशन- डिलीशन पुराव्यासह दाखवले, राहुल गांधींचे 10 गंभीर आरोप

Rahul Gandhi On Election Commission Of India: राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते नेमकं काय म्हणाले हे १० मुद्द्यात घ्या जाणून..

Priya More

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मतचोरीचा गंभीर आरोप केला. यावरूनच त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतचोरी करणाऱ्यांना पाठिशी घातल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी मतचोरीची प्रोसेस दाखवत पुरावे देखील दाखवले. त्याचसोबत त्यांनी मतदारांना देखील समोर आणले. राहुल गांधी यांनी नेमके आरोप काय केले आहेत हे १० मुद्द्यात जाणून घ्या...

राहुल गांधींचे नेमके आरोप काय?

१) कर्नाटकच्या आलंदमध्ये ६०१८ मतदारांची नावे हटवली. कर्नाटकमध्ये बाहेरून मत चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

२) मतदारांची नावं हटवण्यााठी परराज्यातल्या मोबाईल नंबरचा वापर केला गेला. वेगवेगळ्या राज्यातील क्रमांकाचा वापर करून मतं डिलिट केली जात आहेत. त्या क्रमांकावर फोन केल्यास काहीही प्रतिसाद येत नाही.

३) काँग्रेस जिंकू शकते अशा ठिकाणचे मतदार हटवण्यात आले. कर्नाटकमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसचे मते जिथे जास्त होती, त्या ठिकाणी टार्गेट केले. ज्या ठिकाणी काँग्रेसने ८ जागा जिंकल्या, त्या ठिकाणी मतांची चोरी झाली.

४) चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघामध्ये ६,८०० मतदार हटवण्यात आले. आधी मते वाढवण्यात आली होती, आता डिलिट केली जात आहेत.

५) केंद्रीर्कत पद्धतीने मतदारांची नावं हटवली जात आहेत.

६) मुख्य निवडणूक आयुक्त लोकशाहीच्या मारेकऱ्यांना पाठिशी घालत आहेत. मतचोरी करणाऱ्यांना आयुक्तांनी पाठिशी घातल्याचा आरोप त्यांनी केला.

७) दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, ओबीसी मतदरांना लक्ष्य केले जात आहे.

८) कर्नाटक सीआयडीकडून आयोगाला १८ पत्रे पाठवण्यात आली. त्याबाबत कुमार यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.

९) कर्नाटकमध्ये जे झाले ते महाराष्ट्र, हरियाणा अन् उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात झाले आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसने जागा जिंकल्या त्या ठिकाणाची मते हटवण्यात आली.

१०) कर्नाटकमध्ये बाहेरून मत चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. १४ मिनिटांत १२ मते काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका व्यक्तीच्या नंबरवर दोन फॉर्म भरण्यात आले. ३६ सेकंदात फॉर्म भरला अन् जमा केला गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिनाभर गव्हाची चपाती खाल्लीच नाही तर? शरीरात दिसतील 5 मोठे बदल

Pune Mayor : पुण्यात 'महिलाराज'! कोण होणार महापौर? भाजपकडून ५ लाडक्या बहिणींची नावं आघाडीवर

Maharashtra Live News Update : MIM च्या सहर शेख यांना पोलिसांची समज

Women Mayors: राज्यातील १५ महापालिकांवर 'महिलाराज', कुठे कोण महापौर होणार? वाचा लिस्ट

Bigg Boss Marathi 6 : तन्वीला विशालशी पंगा पडणार भारी; रुचितानं केली बोलती बंद, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT